शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अॅक्युप्रेशरचा उपयुक्त फायदा देणारे मण्यांचे सीट मॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 21:59 IST

लाकडाच्या मण्यांद्वारे विणलेल्या सीट्स ड्रायव्हरच्या आसनासाठी खूप चांगल्या असतात. विशेष करून लांबच्या प्रवासात त्याचा चांगला उपयोग होतो. लांबवरच्या प्रवासासाठी ड्रायव्हिंग करणारे व्यावसायिक ड्रायव्हर्स तसे सरावलेले असतात

लाकडाच्या मण्यांद्वारे विणलेल्या सीट्स ड्रायव्हरच्या आसनासाठी खूप चांगल्या असतात. विशेष करून लांबच्या प्रवासात त्याचा चांगला उपयोग होतो. लांबवरच्या प्रवासासाठी ड्रायव्हिंग करणारे व्यावसायिक ड्रायव्हर्स तसे सरावलेले असतात. मात्र वैयक्तिक वापरासाठी साधारणपमे शहराम रोज गाडी वापरणारे व त्क्वचित लांबच्या प्रवासाला ड्राइव्ह करणारे आता वाढत आहेत, हे ही खरे. मात्र त्या लांबच्या प्रवासामध्ये अनेकदा सर्वात जास्त त्रास होतो तो अनेक पाठीची वा कमरेची दुखणी असणाऱ्यांना. त्याचप्रमाणे दुसरा एक त्रास असतो तो घामाचा. घामामुळे सीटवर सतत बसल्याने गरम वा उष्णतेमुळे मांडी वा पार्श्वभागाला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासामध्ये जाताना अनेकजण त्यासाठी मध्ये मध्ये छानपैकी थांबतात, आराम घेतात, पाय मोकळे करतात. मात्र अनेकदा वाहतूक कोंडीमध्ये अडकण्याचाही प्रसंग येतो, त्यावेळी बसून बसून घामाने त्रास सुरू केलेला असतो व त्यात पाठही दुखायला लागलेली असते. अशावेळी आसन व पाश्वर्भाग यामध्ये जर बऱ्यापैकी अंतर असते, थोडी हवा खेळती राहाण्यासारखी जागा असती तर खूप बरे वाटले असते. असा विचार येतो. बाजारात आच ड्रायव्हरच्या आसनावर ठेवण्यासाठी लाकडी व प्लॅस्टिकच्या मण्यांच्या माळा द्वारे तयार केलेले एक मॅट मिळते. हे मॅट लांबच्या प्रवासाला तसे खूप चांगले आहे. विशेष करून प्लॅस्टिकपेक्षा लाकडाच्या मण्यांनी तयार केलेले मॅट अधक चांगले असते. त्यामुळे प्लॅस्टिकने होणारा त्रास होत नाही. त्याचप्रमाणे काचेच्यासारखे मणी असणारे मटेरियलही त्यात वापरले जाते. ते ही वापरण्यास त्रासदायक नसते.मुळात या प्रकारच्या मॅट वा सीट कव्हरमुळे ड्रायव्हरला लांबच्या प्रवासात एक प्रकारचा थकवा कमी जाणवतो.त्यामुळे मांड्यांना येणा-या  घामात काही प्रमाणात घट होते. सतत एकाच जागी असल्याने अंगाला लागणारी रग या प्रकारच्या मण्यांच्या वापरामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे लागत नाही. हा तसा उपाय साधा आहे पण त्याला चांगले व्यापारी रूप देऊन सादर केलेले आहे. त्यामुळे नुकसान काही नाही उलट फायदाच आहे. काहींना हा प्रकार अॅक्युप्रेशरचा वाटतो, पण त्याचा येथे तसा फार काही संबंध नाही. तुम्हाला कोणताही टोतचण्याचा प्रकार येथे नाही. आसनावर बसल्यानंतर सतत फोमवर संपर्क असल्याने तेथे तयार होणारी उष्णता त्रासदायक ठरू शकते, त्यावर असणारा हा साधासुधा उपाय आहे. काहींना सीटची उंची थोडीशी मोटी हवी असते. पम उशी घेतली तर ती जास्त उंच असते, त्यापेक्षा कमी उशी तयार करून घेण्यापेक्षा मण्यांच्या सीटचा उपाय चांगला वाटतो. अर्थात हा प्रत्येकाच्या अनुभवाचा भाग आहे. काहींना ते जमणारही नाही, त्यांना लांबच्या प्रवासात त्रास होतही नसेल, वातानुकूलीत यंत्रणेमुळे घामाचा त्रास नसतो. मात्र रग लागण्यासाठी व रक्तप्रवाह सुरळीत राहाण्यासाठी अशी मण्यांची सीट नक्कीच उपयुक्त ठरू शकते.

टॅग्स :carकार