शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

भारतीय बाजारात धुमाकूळ घालणार नवी Maruti Baleno; देण्यात आले आहेत लक्झरी फीचर्स, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 15:07 IST

दिसण्याच्या दृष्टीने, नवीन बलेनो पूर्णपणे नव्या अवतारात आली आहे. महत्वाचे म्हणजे यात कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत.

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने भारतीय ग्राहकांच्या आवडीची प्रीमियम हॅचबॅक 2022 Baleno लॉन्च केली आहे. हिची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.35 लाख रुपये आहे. तर टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये एवढी आहे. 2022 मधील मारुती सुझुकीची ही पहिली कार आहे जी सर्वात महत्त्वाच्या लॉन्चपैकी एक आहे.

दिसण्याच्या दृष्टीने, नवीन बलेनो पूर्णपणे नव्या अवतारात आली आहे. महत्वाचे म्हणजे यात कंपनीने अनेक नवे फीचर्स दिले आहेत. येथे ग्राहकांना सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेले अनेक फीचर्स मिळतील. कारच्या केबिन आणि एक्सटीरियरमध्येहीही मोठे बदल करण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीनेही ही कार पूर्वीपेक्षा खूपच चांगली झाली आहे.

एक्सटीरियर आणि इंटीरियर दोन्हीमध्येही बदल -मारुती सुझुकीने नवीन बलेनोच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर दोन्हींमध्ये मोठे बदल करून कारला एक फ्रेश लूक दिला आहे. बाह्य भागाला क्रोम गार्निश, दुसऱ्या डिझाइनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प्स आणि एलईडी डीआरएल देण्यात आले आहे. तसेच साइड मिरर्सवर लावण्यात आलेले इंडिकेटर्स आणि क्रोम हँडल्स जुण्या मॉडेल्समधून घेण्यात आले आहे. कारचा मागील भाग पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक झाला आहे. कारण टेललाइट्स आता खूपच स्लिम झाले आहेत. त्यांना एल-आकाराचे डिझाइन देण्यात आले आहे आणि ते नवीन एलईडी सिग्निचरसह आले आहेत. ही कार दिसायला अत्यंत आकर्षक असून ग्राहकांना नक्कीच आवडेल.

लक्झरी कार्स सारखे फीचर्स आणि जबरदस्त सेफ्टी -2022 मारुती सुझुकी बलेनोसह उत्कृष्ट आणि हाय-टेक फीचर्सची संपूर्ण यादी देण्यात आली आहे. यात हेड्स-अप डिस्प्ले, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा, 9-इंचाचा स्मार्टप्ले, प्रो प्लस सिस्टमसह आर्किमीज ट्यूनिंग देण्यात आले आहे. याशिवाय, बलेनोत केलेला सर्वात मोठा बदल म्हणजे, नवीन पिढीचे सुझुकी कनेक्ट अॅप हे 40 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स उपलब्ध करून देते. हे कनेक्टेड फीचर्स इंटरनेवर चालते. यात अॅमेझॉन अॅलेक्साचा समावेश आहे. या शिवाय या कारमध्ये 6 एअरबॅग्स आणि 20 हून अधिक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. 

भारतीय बाजारात 2022 बलेनोचा सामना थेट Hyundai i20, TATA Altroz, Honda Jazz आणि Volkswagen Polo सोबत आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारMarutiमारुती