महिंद्रा अँड महिंद्रा आगामी काळात आपला SUV पोर्टफोलिओ अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनी भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याच्या तायारीत आहे. या सेगमेंटवर सध्या Hyundai Creta चे वर्चस्व आहे. महिंद्राची ही नवीन SUV केवळ क्रेटालाच नव्हे, तर नुकत्याच लॉन्च झालेल्या Tata Sierra सारख्या कारनाही थेट टक्कर देऊ शकेल. महत्वाचे म्हणजे, अद्याप कंपनीने या कारसंदर्भात कुठलीही पक्की माहिती जाहीर केलेली नाही. मात्र, ऑटो इंडस्ट्रीमध्ये या कारसंदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे.
महिंद्राची ही नवी SUV कंपनीच्या नव्या NU_IQ मॉड्यूलर प्लॅटफॉर्मवर आधारित असण्याची शक्यता आहे. या प्लॅटफॉर्मची खासियत म्हणजे, यावर पेट्रोल, डिझेल, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक असे सर्व प्रकारचे पॉवरट्रेन तयार केले जाऊ शकतात. यामुळे ही SUV भविष्यात वेगवेगळ्या इंजिन पर्यायांसह बाजारात दाखल होऊ शकते. ही कार XUV ब्रँड अंतर्गत सादर केली जाईल, असा अंदाज असून ती बाजारात थेट क्रेटाला टक्क देऊ शकते.
ही SUV Vision S कॉन्सेप्टवर आधारित असण्याची शक्यता -डिझाइनसंदर्भात बोलायचे झाल्यास, ही SUV Vision S कॉन्सेप्टवर आधारित असण्याची दाट शक्यता आहे. ही कॉन्सेप्ट नुकतीच स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी सादर करण्यात आली होती. फ्रंटमध्ये ट्विन पीक्स लोगो, आकर्षक LED लाइट्स आणि मजबूत SUV लूक ही याची वैशिष्ट्ये आहेत. अधिक ग्राउंड क्लीयरन्स, मोठे टायर्स आणि रुंद स्टान्स यांमुळे ही कार अधिक दमदार दिसेल. मात्र, प्रोडक्शन मॉडेलमध्ये काही डिझाइन घटक सिंपल ठेवले जाऊ शकतात.
कधीपर्यंत येणार भारतीय बाजारात? -केबिनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या SUV मध्ये नवे स्टीयरिंग व्हील, मोठे टचस्क्रीन, वायरलेस कनेक्टिव्हिटी, पॅनोरॅमिक सनरूफ आणि ड्युअल-टोन इंटीरियर यांसारखी वैशिष्ट्ये दिले जाऊ शकतात. कॉन्सेप्टमध्ये फ्युएल कॅप असल्याने, ही ICE इंजिनवर आधारित SUV असल्याचे स्पष्ट होते. रिपोर्ट्सनुसार, ही नवी मिड-साइज SUV 2027 पर्यंत भारतीय बाजारात दाखल होऊ शकते. या मुळे बाजारातील या सगेमेंटमधील स्पर्धा अधिक तीव्र होऊ शशकते.
Web Summary : Mahindra plans a mid-size SUV to rival Hyundai Creta, possibly based on the Vision S concept. Expected by 2027, it may feature various powertrains, a large touchscreen, and panoramic sunroof, intensifying market competition.
Web Summary : महिंद्रा हुंडई क्रेटा को टक्कर देने के लिए एक मिड-साइज़ एसयूवी लॉन्च करने की योजना बना रही है, जो विजन एस कॉन्सेप्ट पर आधारित हो सकती है। 2027 तक आने की उम्मीद है, इसमें विभिन्न पावरट्रेन, एक बड़ा टचस्क्रीन और पैनोरमिक सनरूफ हो सकता है, जिससे बाजार में प्रतिस्पर्धा तेज होगी।