शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

Mahindra Cars वर ७० हजारांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, कोण-कोणत्या कारवर मिळतोय फायदा वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 12:03 IST

Mahindra Cars Discount: दर महिन्याला, कार उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांसाठी त्यांच्या काही मॉडेल्सवर बंपर सूट आणि उत्तम ऑफर दिल्या जातात.

Mahindra Cars Discount: दर महिन्याला, कार उत्पादक कंपन्यांकडून ग्राहकांसाठी त्यांच्या काही मॉडेल्सवर बंपर सूट आणि उत्तम ऑफर दिल्या जातात. फेब्रुवारी २०२३ मध्ये महिंद्रा अँड महिंद्रा ग्राहकांना महिंद्रा बोलेरो, महिंद्रा XUV300, महिंद्रा बोलेरो निओ आणि महिंद्रा मराझो सारख्या मॉडेल्सवर ७० हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे.

सध्या कंपनी Scorpio N आणि Mahindra XUV400 EV व्यतिरिक्त थार, XUV700, Scorpio Classic सारख्या मॉडेल्सवर कोणत्याही प्रकारची सूट देत नाहीये. 

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरोवर कंपनीकडून ७० हजार रुपयांचे फायदे दिले जात आहेत, या कारच्या बोलेरो बी6 (ओ) व्हेरिएंटवर ७० हजारांची कमाल सूट दिली जात आहे. तर, B4 आणि B6 मॉडेलवर अनुक्रमे ४७ हजार आणि ५० हजार रुपयांची सूट मिळत आहे.

Mahindra Bolero Price: महिंद्रा बोलेरो किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत ९ लाख ५३ हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते जी १० लाख ४८ हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Mahindra Bolero Neo: महिंद्रा या कारवर ५९,००० रुपयांपर्यंत सूट देत आहे. या कारच्या N10 आणि N10 (O) मॉडेल्सवर ही सूट मिळू शकते. त्याचवेळी, कारच्या N4 आणि N8 मॉडेलवर अनुक्रमे ३२ हजार आणि ३४ हजारांपर्यंत सूट दिली जात आहे.

Mahindra Bolero Neo Price: या कारची किंमत ९ लाख ४७ हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते जी ११ लाख ९९ हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Mahindra Marazzo: या महिंद्राच्या कारच्या M2 आणि M4+ मॉडेलवर ३७,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे, तर या कारच्या M6+ प्रकारावर ३०,००० रुपयांपर्यंत सूट आहे.

Mahindra Marazzo Price: या महिंद्रा कारची किंमत १३ लाख ७० हजार रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते जी १६ लाख ३ हजार रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.

Mahindra XUV300: महिंद्रा XUV 300 च्या W8 (O) मॉडेलवर ३५,००० रुपये, W6 व्हेरिअंटवर ३०,००० रुपये आणि XUV300 TurboSport मॉडेलवर ३०,००० रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Mahindra XUV300 W4 वर १० हजार रुपये आणि XUV300 AMT ३५ हजार रुपये डिस्काऊंट दिला जात आहे.

टीप: महिंद्राच्या वाहनांवर उपलब्ध असलेल्या सवलती प्रत्येक शहरामध्ये बदलू शकतात आणि सवलत स्टॉकवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, ऑफरचे संपूर्ण तपशील मिळविण्यासाठी आम्ही तुम्हाला तुमच्या जवळच्या डीलरशिपला भेट द्या.

टॅग्स :Mahindraमहिंद्रा