शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कोट्यवधींची कमाई असूनही या RCB च्या टॉप क्रिकेटरकडे आहे फारच स्वस्तातली कार, किंमत जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:57 IST

आयपीएल 2025 पूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. याच बरोबर, तो बीसीसीआयच्या ग्रेड सी कराराचाही भाग आहे. यामुळे त्याला बोर्डाकडून दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) 9 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. या मुळे RCB चे चाहते अत्यंत आनंदात आहेत. दरम्यान, संघाचा कर्णधार रजत पाटीदारने चाहत्यांचे आभार मानले असून केवळ एक सामना शिल्लक आहे, त्यानंतर आपण एकत्रितपणे जल्लोष करूयात, असे म्हटले आहे. खरे तर रजतची जीवनशैली अत्यंत साधी आहे. या टॉप क्रिकेटरकडे कोणती कार असेल, याचा अंदाज आपण लावू शकता?

आयपीएल 2025 पूर्वी, आरसीबीने रजत पाटीदारला 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले. याच बरोबर, तो बीसीसीआयच्या ग्रेड सी कराराचाही भाग आहे. यामुळे त्याला बोर्डाकडून दरवर्षी 1 कोटी रुपये मिळतात. त्याचे कार कलेक्शनही अगदी साधारण आहे. रजतकडे ह्युंदाई आय20 कार आहे, या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 7 लाख रुपयांपासून सुरू होते.

अशी आहेत ह्युंदाई आय20 ची वैशिष्ट्ये -ह्युंदाई आय20 मध्ये, अशी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी महागड्या कारमध्ये दिसतात. यात 10.25 इंचांचे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम आहे, जे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह येते. या कारमध्ये ७-स्पीकरचे जबरदस्त साउंड सिस्टिम देण्यात आले आहे, जे जबरदस्त संगिताचा अनुभव देते. या कारला पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि इलेक्ट्रिक सनरूफ देण्यात आले आहे.

याशिवाय, कारमध्ये ६ एअरबॅग्ज (मानक सुरक्षा वैशिष्ट्ये) आणि टीपीएमएस (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम) देखील देण्यात आली आहेत. याशिवाय, एअर प्युरिफायर आणि अॅम्बियंट लाइटिंगसारख्या वैशिष्ट्येही देणण्यात आली आहेत.

इंजिन आणि पॉवर -ह्युंदाई i20 मध्ये एक 1.2 लिटरचे 4-सिलिंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे जास्तीत जास्त 83.13 हॉर्सपावरची पॉवर आणि 115 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये ग्राहकांना दोन ट्रान्समिशन पर्याय मिळतात. एक 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, जो क्लासिक ड्रायव्हिंगचा फील देतो आणि एक 6-स्पीड CVT (iVT) ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, जो स्मूद रायडिंगचा आनंद देतो.

टॅग्स :Royal Challengers Bangaloreरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरIPL 2025इंडियन प्रिमियर लीग २०२५