शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Driving License Rules: लायसन हरवलेय तर चिंता सोडा, डुप्लिकेटसाठी असा Online अर्ज करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 15:50 IST

How to get Duplicate Driving License: लायसन हरविले तर नवे मिळविण्यासाठी आता लोकांना आरटीओमध्ये जायची गरज नाही. मोबाईलवर काही मिनिटांत तुम्ही नवीन लायसन साठी अर्ज करू शकणार आहात. 

जुन्या ड्रायव्हिंग लायसनबाबत केंद्र सरकारने ऑनलाईन नोंदणी करण्याची कालच मुदत पुन्हा वाढवणार नसल्याचे कळविले आहे. यामुळे हातात केवळ २० दिवस आहेत. अशातच आता लोकांची लायसन शोधण्याची धावपळ उडाली आहे. ही प्रक्रिया करण्यासाठी जरी आरटीओमध्ये जावे लागत असले तरी, लायसन हरविले तर नवे मिळविण्यासाठी आता लोकांना आरटीओमध्ये जायची गरज नाही. मोबाईलवर काही मिनिटांत तुम्ही नवीन लायसन साठी अर्ज करू शकणार आहात. 

तुम्ही घरबसल्या डुप्लिकेट लायसनसाठी अर्ज करू शकता. अनेक ठिकाणी योजनांचा लाभ घेण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून लायसनची गरज असते. जर तुमचे जुने ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन हरवले असल्यास तुम्हाला गाडी बाहेर काढणे तोट्याचे ठरू शकते. वाहतूक पोलिसांनी थांबविले तर किंवा अपघात वगैरे झाला तर तुम्ही अडचणीत येऊ शकता. आता लायसन नसल्याचा दंड एवढा आहे की, तो भरण्यासाठी खिसाच रिकामा होऊ शकतो. 

यामुळे तुम्ही वेळेतच लायसन काढलेले बरे. डुप्लिकेट लायसन मिळविण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनद्वारे ते मिळवू शकता. तुम्हाला एक काम करावे लागणार आहे. ते म्हणजे पोलीस ठाण्यात जाऊन तुम्हाला एफआयआर दाखल करावा लागणार आहे. जर जुने लायसन तुमच्याकडे असेल आणि ते खराब झाले असेल तर ते जमा करावे लागणार आहे. यानंतर डुप्लिकेटसाठी अर्ज करता येईल. 

अशी आहे प्रक्रिया....सर्वप्रथम परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जा व मागितलेले तपशील येथे भरा. यानंतर, एलएलडी फॉर्म भरा. त्याची प्रिंट काढा. यानंतर तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा. आता हा फॉर्म आणि सर्व कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा करा किंवा तो भरून पुन्हा आरटीओच्या वेबसाईटवर अपलोड करा. ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे येईल.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस