शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पगार १ लाखाहून कमी असेल तर नवीन कार खरेदी करायची की जुनी?; समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 11:09 IST

जर तुम्ही एखाद्या मेट्रो शहरात राहत असाल तर सहजपणे तुम्हाला कॅब सुविधा मिळू शकते. परंतु कार घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या बजेटनुसार त्याचं प्लॅनिंग करा.

मुंबई - आजच्या काळात बे'कार' कुणाला राहू वाटत नाही. काही लोकांची गरज असते तर काही स्टेटस राखण्यासाठी कार खरेदी करतात. ज्यांच्याकडे पैशाची कमी नाही ते वेगवेगळ्या कार खरेदी करण्याचा छंद जोपासतात. कार खरेदी करण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग ती कार खरेदी कधी करायची? त्यासाठी तुमचा पगार किती हवा? कुठल्या किंमतीची कार खरेदी करायला हवी? याबाबत आपण जाणून घेऊया. 

कार खरेदी कधी करायची?जर तुम्ही एखाद्या मेट्रो शहरात राहत असाल तर सहजपणे तुम्हाला कॅब सुविधा मिळू शकते. परंतु कार घेण्याची इच्छा असेल तर तुमच्या बजेटनुसार त्याचं प्लॅनिंग करा. अनेकजण विनाप्लॅन कार खरेदी करतात त्यानंतर EMI भरताना त्यांच्या नाकीनऊ येते. कारचा ईएमआय एकूण सॅलरीच्या ७ ते १० टक्के असायला हवा कारण पगाराचा मोठा भाग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि बचत यासाठी असतो. अर्थगणितानुसार, एकूण उत्पन्नाच्या जास्तीत जास्त १० टक्के भाग कारच्या EMI साठी खर्च करू शकतात. 

उदाहरण समजा, एका मध्यमवर्गीय कुटुंबाला कार खरेदी करायची असेल तर ती जवळपास ७ लाखांपर्यंत असते. ही मारुतीची WagonR, TATA Punch, Hyundai i10 होऊ शकते. नेहमी ग्राहक कार खरेदी करताना १ लाख रुपये डाऊनपेमेंट देतात. बाकी ६ लाख ईएमआय भरण्यासाठी तयार असतात. कार लोन हे ५-७ वर्षांसाठी असते. आपण ५ वर्षाचा कालावधी ग्राह्य धरू. सध्या कार लोनवर ८ टक्के व्याजदर आहे. अशावेळी ६ लाखांच्या कर्जासाठी ८.५० टक्के व्याजाने ५ वर्षासाठी ईएमआय १४३६२ रुपये असेल. म्हणजे दरमहिन्याला १४३६२ रुपये EMI भरावा लागेल. त्याप्रमाणे ५ वर्षात ग्राहकाला एकूण ८ लाख ६१ हजार ६९४ रुपये भरावे लागतील. ज्यात व्याजाचा भाग १ लाख ६१ हजार ६९४ इतका असेल. 

आता मुद्द्याची गोष्ट म्हणजे, दरमहिन्याला १४३६२ रुपये ईएमआय भरण्यासाठी तुमची सॅलरी कमीत कमी १ लाख रुपये महिना असायला हवी. कारण सॅलरीचा ७-१० टक्के भाग कारच्या ईएमआयसाठी वापरावा लागेल. जर सॅलरी १ लाखाहून कमी असेल तर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याऐवजी ३-४ वर्ष जुनी कार खरेदी करू शकता. जी तुम्हाला ३ लाखापर्यंत मिळू शकते. म्हणजे तुम्ही १ लाख डाऊनपेमेंट केल्यास ५ वर्ष तुम्हाला ४ हजार १५२ रुपये EMI भरावा लागेल. 

जुनी कारकारची किंमत - ३ लाख रुपयेडाऊनपेमेंट - १ लाख रुपयेकर्ज - २ लाख रुपयेकालावधी - ५ वर्ष व्याजदर - ९ टक्के वार्षिकEMI - ४ हजार १५२ रुपयेएकूण पेमेंट - १ लाख + २ लाख ४९ हजार १०० रुपये = ३ लाख ४९ हजार १०० रुपये 

नवीन कार आणि जुनी कार यांच्यात ६ लाख १२ हजार ५९४ रुपये तफावत आहे. कार खरेदी करतानाचा डाऊनपेमेंट समान आहे. परंतु EMI मध्ये खूप फरक आहे. त्यामुळे कार खरेदी करताना तुमच्या पैशांची बचत कशी होईल. दर महिन्याला EMI भरण्याचा ताण कितपत झेपेल? याचा विचार करून चारचाकीचं स्वप्न पूर्ण करा.