शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

Hyundai Creta नव्या रूपात लाँच, MG Hector ला टक्कर देणार; पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 09:33 IST

All New hyundai creta बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत. 

नवी दिल्ली : ह्युंदाईने भारतीय बाजारात क्रेटा ही एसयुव्ही नव्या अवतारात लाँच केली आहे. क्रेटाचे 5 व्हेरिअंट उपलब्ध असून 14 मॉडेल्स आहेत. यामध्ये  E, EX, S, SX  आणि SX (O) यांचा समावेश आहे. 

बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत. नव्या क्रेटामध्ये थ्रीडी कॅस्केडिंग ग्रील देण्यात आली असून त्यावर एलईडी हेडलाईटसोबत नवीन स्प्लिट डेटाईम रनिंग लँप दिला आहे. बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. 17 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स आणि पाठीमागे एलईडी टेललाईट देण्यात आले आहेत. 

अंतर्गत रचनेमध्येही मोठे बदल केले आहेत. 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन डिस्प्लेसोबत इन कार कंट्रोल्स देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन मल्टी फंक्षनल फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील आणि 7 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटोही देण्यात आला आहे. नव्या पिढीच्या या कारमध्ये ब्लूलिंक टेकसोबत 50 हून अधिक कनेक्टेड फिचर्स दिले आहेत. यामध्ये स्मार्टवॉच अ‍ॅप, पॅनारोमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट, इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशन मॉनिटर सिस्टिम आहे. याशिवाय एक रिअर व्ह्यू मॉनिटरही देण्यात आला आहे. 

या कारमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल, 1.5 लीटर व्हीजीटी डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड अ‍ॅटोमॅटीक असे दोन गिअर बॉक्समध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत 9.9 लाखांपासून सुरु होत असून टॉप व्हेरिअंट 17.20 लाखांना एक्स शोरुम उपलब्ध आहे.

ही कार mg hector, kia seltos, मारुतीची breza आणि टाटा hariar ला टक्कर देणार आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटाMarutiमारुतीMG Motersएमजी मोटर्सKia Motars Carsकिया मोटर्स