शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

थोडा इंतजार! काही महिने होत नाही तोच, Hyundai Creta येतेय नव्या अवतारात; पहा एकच झलक...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 14:20 IST

2022 Hyundai Creta facelift: बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत. 

नवी दिल्ली : ह्युंदाई भारतातील दुसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी आहे. Hyundai Creta भारतातील सर्वात पॉप्युलर मिड साईज एसयुव्ही आहे. जर ह्युंदाई क्रोटा खरेदी करायची असेल तर थोडा वेळ वाट पाहिली तर फायद्याचे ठरणार आहे. कंपनी भारतीय बाजारात नवीन क्रेटा (2022 Hyundai Creta Facelift) लाँच करण्याची तयारी करत आहे. हे कारचे मिड लाईफ अपडेट असणार आहे. (2022 Hyundai Creta facelift have been spotted undergoing road trials.)

या कारचे फेसलिफ्ट कोरियामध्ये टेस्टिंग करताना पाहण्यात आले आहे. क्रेटाच्या कॅमोफ्लॉज व्हर्जनला तेथील रस्त्यांवर पाहिले गेले आहे. यानंतर कारच्या लाँचिंगबाबत चर्चा सुरु झाली आहे. भारतात ही कार आपल्या सेगमेंटची बेस्ट सेलर आहे. मार्च 2020 मध्ये भारतात क्रेटाचे नवीन मॉडेल लाँच झाले होते. 

सध्याच्या क्रेटाचे फिचर्स...बीएस6 मध्ये ही गाडी लाँच करताना कंपनीने मोठे बदल केले आहेत. डिझाईन आणि स्टाईल बदलताना कंपनीने यामध्ये या सेगमेंटमधील नवीन फिचरही दिले आहेत. या नव्या क्रेटामध्ये थ्रीडी कॅस्केडिंग ग्रील देण्यात आली असून त्यावर एलईडी हेडलाईटसोबत नवीन स्प्लिट डेटाईम रनिंग लँप दिला आहे. बंपरमध्येही बदल करण्यात आले आहेत. 17 इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स आणि पाठीमागे एलईडी टेललाईट देण्यात आले आहेत. 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन डिस्प्लेसोबत इन कार कंट्रोल्स देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन मल्टी फंक्षनल फ्लॅट बॉटम स्टिअरिंग व्हील आणि 7 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. अ‍ॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटोही देण्यात आला आहे. नव्या पिढीच्या या कारमध्ये ब्लूलिंक टेकसोबत 50 हून अधिक कनेक्टेड फिचर्स दिले आहेत. यामध्ये स्मार्टवॉच अ‍ॅप, पॅनारोमिक सनरुफ, व्हेंटिलेटेड सीट, इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक, टायर प्रेशन मॉनिटर सिस्टिम आहे. याशिवाय एक रिअर व्ह्यू मॉनिटरही देण्यात आला आहे. 

या कारमध्ये 1.5 लीटरचे पेट्रोल, 1.5 लीटर व्हीजीटी डिझेल आणि 1.4 लीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड अ‍ॅटोमॅटीक असे दोन गिअर बॉक्समध्ये ही कार उपलब्ध आहे. या कारची किंमत 9.9 लाखांपासून सुरु होत असून टॉप व्हेरिअंट 17.20 लाखांना एक्स शोरुम उपलब्ध आहे.

टॅग्स :Hyundaiह्युंदाई