शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

जबरदस्त फीचर्ससह लाँच झाली Hyundai Creta चं नवं व्हेरिअंट; पाहा Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 19:18 IST

Hyundai Creta : पाहा किती बदललीये नवी ह्युंदाई क्रेटा. कोणते मिळतायत नवे फीचर्स.

ठळक मुद्देपाहा किती बदललीये नवी ह्युंदाई क्रेटा. कोणते मिळतायत नवे फीचर्स.

दक्षिण कोरियाची आघाडीची वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाईने (Hyundai) आपल्या प्रसिद्ध स्पोर्टी युटिलिटी व्हेइकलचे (SUV) नवीन फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. कंपनीने या नवीन एसयुव्हीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामुळे ते सध्याच्या मॉडेलपेक्षा बरेच वेगळे बनले आहे. कंपनीनं एसयुव्हीचा एक व्हिडीओ देखील जारी करण्यात आला आहे. ह्युंदाईने ही नवीन क्रेटा फेसलिफ्ट दक्षिण अमेरिकन बाजारात विक्रीसाठी लाँच केली आहे.

लूक, डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत नवीन क्रेटामध्ये अनेक बदल करण्यात आले असले तरी सर्वात मोठा बदल हा कारच्या सिक्युरिटीबाबत करण्यात आला आहे. कारच्या इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग कॅमेरा डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. ही यंत्रणा, चालकाला कोणत्याही येणाऱ्या वाहनांसाठी सतर्क ठेवण्याव्यतिरिक्त, सायकलस्वार, पादचारी किंवा इतर वाहने पुढे असताना अशा परिस्थितीत देखील कार्य करते. एवढेच नाही ही सिस्टम चालक नसताना ऑटोनॉमस ब्रेकिंग लागू करतं.

एक्सटीरिअर डिझाईननवी ह्युंदाई क्रेटा २०२२ भारतात सध्या विक्री होत असलेल्या मॉडेलच्या तुलनेत काही बदलांसह येतं. लूक आणि डिझाईनच्या दृष्टीनं या एसयुव्हीमध्ये अनेक बदल या कारच्या फ्रन्टमध्ये करण्यात आले आहेत. या एसयुव्हीमध्ये नवा फ्रन्ट ग्रील देण्यात आला आहे जो सध्या लाँच झालेल्या SUV 7 सीटर Alcazar पासून प्रेरित असल्याचं दिसून येतं.इंटीरियर डिझाइन नव्या Hyundai Creta च्या इंटीरिअरबद्दल सांगायचं झालं ब्लॅक आणि बेज या ड्युअल कलर टोनमध्ये ते येतं. हे सध्याच्या मॉडेलसारखंच आहे. सेंट्रल कन्सोलदेखील पहिल्याप्रमाणेच आहे. परंतु इन्फोटेन्मेंट स्क्रिन हॉरिझॉंटल ठेवण्यात आलं आहे. तसंत ते डॅशबोर्डच्या एका मोठ्या भागाला कव्हक करतं.

मिळतात हे फीचर्सनव्या क्रेटामध्ये काही सेफ्टी फीचर्स सामिल करण्यात आलं आहे. यामध्ये ब्लाईंड स्पॉट मॉनिटरींग सिस्टमच्या व्यतिरिक्त अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) फीचर देण्यात आलं आहे. कार लेफ्ट कन्वर्जन्स डिटेक्शनसोबत येते, हे एक असं फीचर आहे जे ड्रायव्हिंगच्या वेळी देखरेख ठेवतं. इतकंच नाही आवश्यक असेल तर हे आपात्कालिन परिस्थितीत ब्रेकही लावतं.

काही अन्य फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झालं यात ड्रायव्बर फेटीह डिटेक्टर, अॅडप्टीव्ह हाय लाईट, अडप्टीव्ह स्पीड कंट्रोलसारखे फीचर्सही मिळतात. या व्यतिरिक्त या कारमध्ये सहा एअरबॅग्स आणि फोर व्हिल डिस्क ब्रेकसोबत येतात. ब्राझीलमध्ये ही एसयुव्ही दोन इंजिन पर्यायांमध्ये येते. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकारBrazilब्राझील