शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Hyundai धमाका करणार; नव्या सात सीटर एसयुव्ही Alcazar ची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 15:58 IST

Hyundai Alcazar global launch soon: दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे.

दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईच्या सर्वाधिक खपाच्या क्रेटा एसयुव्हीचे 7 सीटर व्हर्जन येणार असल्याची गेल्य़ा काही काळापासून चर्चा सुरु होती. याच्या मॉडेलच्या नावावरून देखील चर्चा होत होती. आता कंपनीने हे नाव जाहीर केले आहे. Hyundai Alcazar असे नाव देण्यात आले असून लवकरच ही सात सीटर एसयुव्ही लाँच केली जाणार आहे. ( Creta's 7-seater version, Officially named as Hyundai Alcazar)

नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्स

ह्युंदाईने या एसयुव्हीचा एक टीझरही जारी केला आहे. Hyundai Alcazar ही कार येत्या एप्रिलपर्यंत लाँच होण्याची शक्यता आहे. ह्युंदाई ही कार “personify reliability and indulgence” वर तयार केली आहे. भारतात लाँच झाल्यावर ही कार एमजी हेक्टर प्लस, टाटा सफारी आणि आगामी महिंद्रा एक्सयुव्ही 500 ला टक्कर देणार आहे. 

Tata Safari Launch: नव्या टाटा सफारीची किंमत जाहीर झाली; जाणून घ्या फिचर्स आणि व्हेरिअंट

नवीन ह्युंदाई अल्काझर एसयुव्ही ही क्रेटामध्ये मिळणाऱ्या छतऐवजी फ्लॅटर रुफची असणार आहे. ही कार क्रेटापेक्ष वेगळी असणार आहे. पाठीमागे नवीन एलईडी टेललँप आणि फ्लॅटर प्रोफाईलसह नवीन बंपर आणि टेलगेट देण्यात येणार आहे. 7 सीटर कारमध्ये क्रोम स्टडेड रेडिएटर ग्रील, नवीन बंपर आणि हेडलँप मिळणार आहेत. 

MG Moters कडून नवी ‘हेक्टर २०२१’ लाँच; इंग्लिश नाही तर हिंग्लिश कमांड्सही देता येणार

या कारमध्ये सहा आणि सात सीटरचा पर्याय़ देण्यात येण्याची शक्यता आहे. तसेच क्रेटापेक्षा जास्त मोठी 10.25 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्याची शक्यता आहे. नवीन मॉडेल ऑटो डिमिंग IRVM, 360 डिग्री कॅमरा, लेदर अपहोल्स्ट्री आणि फ्रंट पार्किंग सेंसर ने युक्त असणार आहे. 

2021 Jeep Compass भारतात लाँच; पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत बदल

इंजिन...Hyundai Alcazar मध्ये दोन इंजिन पर्याय मिळण्याची शक्यता आहे. 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 1.5-लीटर टर्बो-डिझेलचे इंजिन असेल. पेट्रोल इंजिन 138bhp ताकद आणि 250Nm चा टॉर्क प्रदान करेल. तर डिझेल इंजिन 113bhp ताकद आणि 250Nm टॉर्क प्रदान करेल. कंपनी यामध्ये 1.5-लीटर 4-सिलेंडर नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिनाचा देखील वापर करण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटाMG Motersएमजी मोटर्स