देशात जीएसटी २.० लागू होणार आहे. दुचाकी, चारचाकी बाजारात मोठी धूम येणार आहे. कारण चारचाकींच्या काही लाखांत, तर दुचाकींच्या काही हजारांत किंमती कमी होणार आहेत. अशातच सर्वाधिक खपाच्या दोन स्कूटर एक म्हणजे होंडा अॅक्टिव्हा आणि दुसरी म्हणजे टीव्हीएस ज्युपिटर यांच्या किंमती किती कमी होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
देशात सर्वाधिक विकली जाणारी होंडा अॅक्टिव्हा १२५ सीसी २२ सप्टेंबरनंतर 6,750 रुपयांनी स्वस्त होणार आहे. या स्कूटरची किंमत 81000 रुपये होती, ती आता कमी होऊन 74,250 रुपये होईल.
तर TVS Jupiter 125 ची किंमत 6,333 रुपयांनी कमी होणार आहे. Suzuki Access 125 ची किंमत 6,611 रुपयांनी कमी होणार आहे. Hero Maestro Edge 125 ही 6,389 रुपयांनी कमी होईल. होंडा डिओ १२५ ही ६,२२२ रुपयांनी, सुझुकी बर्गमन स्ट्रीट १२५ ६,४४४ रुपयांनी कमी होणार आहे. यामाहा फॅसिनो १२५ ही स्कूटर ५,३३३ रुपयांनी कमी होणार आहे. हिरो डेस्टिनी १२५ स्कूटर ५,३८९ रुपयांनी, एप्रिलिया एसआर १२५ ही ६,८५२ रुपयांनी कमी होणार आहे.