शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी किती फायदेशीर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 16:30 IST

शहरात दररोज काचे भरपूर रनिंग होणार आहे, वाहतूककोंडीमध्येही तोंड द्यावे लागणार आहे व त्यामुळे इंधनावर जास्त खर्च करायची चिंता असेल तर सीएनजी वापरा, चार वर्ष वापरल्यानंतर पैसे वसूल कार विकून दुसरी घ्या.

शहरात दररोज काचे भरपूर रनिंग होणार आहे, वाहतूककोंडीमध्येही तोंड द्यावे लागणार आहे व त्यामुळे इंधनावर जास्त खर्च करायची चिंता असेल तर सीएनजी वापरा, चार वर्ष वापरल्यानंतर पैसे वसूल कार विकून दुसरी घ्या... असा साधा सरळ सल्ला अनेकजण देतात. सीएनजी स्वस्त आहे म्हणून कार वापरणारे महाभाग कमी नाहीत पण या स्वस्त सीएनजीचा विचार करता ती कार जास्तीत जास्त वापरली गेली तर उपयोग, अन्यथा सीएनजी कीटसाठी वा सीएनजी कीट कंपनी फिटेड आहे म्हणून अधिक पैसे मोजण्यात काही अर्थ नाही.सध्या इंधनाचे एकंदर चार प्रकार उपलब्ध आहेत. डिझेल, पेट्रोल, सीएनजी व एलपीजी. याशिवाय इलेक्ट्रिक मोटारही आता उपलब्ध आहेत. मात्र शहरांमध्ये खास करून सध्या सीएनजी या इंधनावर चालणाऱ्या कारवर अधिक भर देण्यात येत आहे. सीएनजी इंधनाची किंमत ही पेट्रोल व डिझेलपेक्षा खूप कमी असल्याने आणि किंमतीच्या तुलनेत मिळणारे मायलेज हे आकर्षक असल्याने सीएनजीवर चालणाऱ्या मोटारींना शहरामध्ये अधिक मागणी आली तर नवल नाही. आता काही कंपन्या तर थेट सीएनजी सुविधा असलेल्या मोटारीही ग्राहकांसमोर सादर करू लागल्य. या आधी ती सुविधा नव्हती तेव्हा कारमध्ये सीएनजी कीट बाहेरून लावून घेतला जात होता. सीएनजी कीट लावल्यानंतर त्याची नोंद आरटीओकडे करावी लागते, त्याची नोंद आरसी बुकवरही येते व तशी सीएनजी कीटची मुदत, तो बसवल्याची तारीख याची नोंद असलेली एक पट्टी कारमध्ये- वाहनामध्ये लावली जाते. सध्या हॅचबॅक, सेदान, एमयूव्ही (MULTI UTILITY VEHICLE) यात प्रामुख्याने सीएनजी यंत्रणेचा वापर होत आहे. असे असूनही मुंबई, पुण्यासारख्या काही निवडक शहरांमध्ये व शहराबाहेर काही अल्प ठिकाणी सीएनजी भरणआ केंद्रे आहेत. किंबहुना सीएनजीसाठी लागणाऱ्या रांगा कमी झालेल्या नाहीत व सीएनजी केंद्रे शहरातही आवश्यक प्रमाणात वाढलेली नाहीत. मुंबईतील बेस्ट बस, रिक्षा, टॅक्सीसेवा, टुरिस्ट वाहने आता पूणर्पणे सीएनजीवर आणली गेली आहे. काही मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंनाही सीएनजी बसवण्यात आलेला आहे.सीएनजी (COMPRESSED NATURAL GAS) खरोखरच बसवण्याची गरज आहे का, असाही प्रश्न जाणकारांना पडतो. मुंबई, पुणे, नाशिक या शहरांमध्ये आता सीएनजी मिळत असल्याने सीएनजीच्या टाकीच्या क्षमतेची बाब लक्षात घेतली तर या शहरांमध्ये व परिसरात ये-जा करता येते हे देखील फायद्याचे आहे. पण तरीदेखील सीएनजी भरणा केंद्रावरील गर्दी पाहिली की, नको तो सीएनजी आपले पेट्रोल बरे असा सरळ विचार योग्य वाटतो. मुळात विचार करण्यासारखी एक बाब आहे, ती म्हणजे डिझेलसाठी, पेट्रोलसाठी स्वतंत्र बनावटीचे इंजिन आहे मग ते सीएनजीसाठी का बनवले गेले नाही?