दिल्लीउच्च न्यायालयाने सोमवारी एका याचिकेवर सुनावणी करताना पोलिसांना दिशानिर्देशन करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून पोलिसांचे नागरिकांशी होणाऱे वर्तन सुधारेल आणि पारदर्शकता येईल. यासाठी पोलिसांच्या खांद्यावर बॉडी कॅमेरा लावण्याचे उच्च न्यायालयाने सुचविले आहे.
दिल्लीमध्ये नुकतीच एक घटना घडली होती. एक टेम्पोचालक पोलिसांवर तलवार घेऊन धावला होता. यानंतर त्या ठिकाणी पोलिस आणि गटामध्ये हाणामारीही झाली होती. यानंतर टेम्पोचालक आणि त्याच्या मुलाला मारहाण करण्यासाठी पोलिसांवर आरोपही झाले होते. या प्रकारावरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश डी एन पटेल आणि सी हरिशंकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. त्यांनी गृह मंत्रालय, दिल्ली सरकार आणि दिल्ली पोलिसांना वकील आणि सामाजिक कार्यकर्ते अमित साहनी यांच्या प्रस्तावावर विचार करायला सांगितले आहे. तसेच न्यायालयाने आपण कोणत्याही प्रकारचे निर्देश देत नसल्याचेही यावेळी सांगितले.