शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

2022 मध्ये खरेदी करा कार, 2023 मध्ये भरा ईएमआय; होंडाची स्पेशल फायनान्स स्कीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 16:18 IST

Honda Drive in 2022 Pay in 2023 Offer: होंडाची ही स्पेशल फायनान्स स्कीम फक्त कंपनीच्या होंडा अमेज (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) वर वैध आहे.

नवी दिल्ली :  होंडा कार्स इंडियाने ( Honda Cars India) सणासुदीच्या काळात आपल्या कारची विक्री वाढवण्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरला कंपनीने ड्राइव्ह इन 2022 , पे इन 2023 (Drive in 2022, Pay in 2023) असे नाव दिले आहे. कंपनीची ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. Honda Cars ची ही ऑफर एक स्पेशल फायनान्स स्कीम आहे, ज्यासाठी कंपनीने Kotak Mahindra Prime Limited च्या संयुक्त विद्यमाने आणली केली आहे. 

होंडाची ही स्पेशल फायनान्स स्कीम फक्त कंपनीच्या होंडा अमेज (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) वर वैध आहे. होंडाच्या या स्पेशल फायनान्स स्कीमनुसार, कंपनी या दोन कारच्या खरेदीवर ग्राहकांना एक ऑफर देत आहे, ज्यामध्ये ते 2022 मध्ये या कार खरेदी करू शकतात, त्यानंतर 2023 पासून या कारचा मासिक EMI सुरू होईल. Honda Cars आणि Kotak Mahindra यांच्या भागीदारीतील या फेस्टिव्ह फायनान्स स्कीमचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही Honda Amaze आणि Honda City ची माहिती जाणून घ्या.

Honda AmazeHonda Amaze ही मिड-रेंज सेडान आहे, जी तिच्या डिझाइन आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. कंपनीने या कारचे तीन ट्रिम बाजारात आणले आहेत.

Honda Amaze PriceHonda Amaze ची सुरुवातीची किंमत 6.63 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर 11.50 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.

Honda Amaze Engine and TransmissionHonda Amaze मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 90 PS पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे दुसरे इंजिन 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 100 PS पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.

Honda CityHonda City ही सेडान सेगमेंटची प्रीमियम कार आहे, जी तिच्या डिझाइन, केबिन स्पेस आणि फीचर्समुळे पसंत केली जाते. कंपनीने आतापर्यंत या कारचे तीन ट्रिम बाजारात आणले आहेत.

Honda City PriceHonda City सेडानची किंमत 11.57 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटमध्ये 15.52 लाख रुपये आहे.

Honda City Engine and TransmissionHonda City  मध्ये कंपनीने दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. यातील पहिले इंजिन 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे जे 100 PS पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिने 6 स्पीड गिअरबॉक्स आणि 7 स्पीड CVT ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत.

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझ