शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

Hero MotoCorp Vida Electric Scooter Brand: ओरिजिनल हिरो मोटोकॉर्पने 'विडा' उचलला; १ जुलैला नव्या ब्रँडची इलेक्ट्रीक स्कूटर येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 12:56 IST

Hero MotoCorp Electric Scooter Brand Vida: ओरिजिनल कंपनीचे हिरो हे नाव वेगळ्या झालेल्या हिरो इलेक्ट्रीक कंपनीला मिळाले आहे. तेव्हा हिरो मोटोकॉर्पच्या हे लक्षात आले नव्हते.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी टू व्हीलर कंपनी हिरो मोटोकॉर्पने मोठी घोषणा केली आहे. इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात कंपनी पाऊल ठेवणार असून यासाठी नव्या ब्रँडचे लाँचिंगही केले आहे. दुबईत झालेल्या एका कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. पवन मुंजाल यांनी या इलेक्ट्रीक ब्रँडची घोषणा केली आहे. मूळ कंपनी हिरो मोटोकॉर्पने इलेक्ट्रीक वाहने बाजारात आणू नयेत यासाठी काही वर्षांपूर्वी वेगळे झालेल्या हिरो इलेक्ट्रीकने न्यायालयात धाव घेतली होती. यावरून दोन भावंडांमध्ये वाद सुरु आहेत. ओरिजिनल कंपनीचे हिरो हे नाव त्या वेगळ्या झालेल्या कंपनीला मिळाले आहे. तेव्हा हिरो मोटोकॉर्पच्या हे लक्षात आले नव्हते. याचा फायदा त्या कंपनीला झाला असून हिरो मोटकॉर्प आपल्या नावाने इलेक्ट्रीक स्कूटर आणू शकत नव्हती. आता कंपनीने नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. 

या ब्रँडचे नाव विडा (Vida) असे ठेवले आहे. यामध्ये कंपनी १०० दशलक्ष डॉलर गुंतविणार असून या प्रकल्पासाठी ग्लोबल पार्टनरशीपमध्येही गुंतवणूक केली जाणारा आहे. हिरो हा देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठा टुव्हीलर ब्रँड आहे. 

हिरोच्या या विडा ब्रँडची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर १ जुलैला लाँच केली जाणार आहे. याच दिवशी हिरो मोटोकॉर्पचे माजी अध्यक्ष डॉ. बृजमोहन लाल यांची जयंती आहे. कंपनीच्या चित्तूर प्रकल्पात या स्कूटरची निर्मिती केली जाणार आहे. 

वाद काय....हिरो-होंडा जशी वेगळी झाली तशी हिरो कंपनीचेही दोन कुटुंबात विभाजन झाले आहे. दशकभरापूर्वी मुंजाल फॅमिलीमध्ये हिरो कंपनीची इलेक्ट्रीक विंग आणि मोटोकॉर्प असे विभागले गेले. आज दशकभराने हिरो कंपन्यांचे हे दोन मालक पुन्हा आमनेसामने आले आहेत. तेव्हा झालेल्या करारानुसार विजय आणि नवीन मुंजाल (पिता-पूत्र) यांना हिरो इलेक्ट्रीकची मालकी मिळाली, तर पवन मुंजाल यांना हिरो मोटोकॉर्पची मालकी. करारातील दाव्यानुसार विजय मुंजाल यांना इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो हे नाव वापरण्याची परवानगी आहे, यामुळे मुळ हिरो कंपनीने त्यांच्या इलेक्ट्रीक वाहनांसाठी हिरो हे नाव वापरू नये असा दावा हिरो इलेक्ट्रीकने ठोकला आहे. यामुळे हिरो इलेक्ट्रीक ही खरी हिरो मोटोकॉर्प नाही, तर ती वेगळी कंपनी आहे. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्प