शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपूर्वी Hero नं पहिल्यांदा लॉन्च केली होती बाईक, नव्या अवतारात होणार रिलॉन्च?; पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 22:55 IST

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प आपली लोकप्रिय बाइक Karizma पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली-

देशातील सर्वात मोठी दुचाकी निर्माती कंपनी हिरो मोटोकॉर्प आपली लोकप्रिय बाइक Karizma पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च करण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी ही बाइक या वर्षाच्या अखेरीस लॉन्च करू शकते. Hero Karizma अगदी नव्या लूक आणि डिझाइनमध्ये बाजारात दाखल होणार आहे आणि ती नव्या प्लॅटफॉर्मवर तयार केली जाणार आहे. 

हिरो कंपनी या वर्षाच्या अखेरीस बाजारात आपली आयकॉनिक बाइक हिरो करिझ्मा पुन्हा एकदा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. अद्याप याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी 210CC क्षमतेचं नवं लिक्विड-क्लूड प्लॅटफॉर्मवर काम करणार आहे. याच आधारावर नवी बाईक तयार केली जाणार आहे. 

Hero Karizma आपल्या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय बाइक होती. २००३ साली बजाज कंपनीनं आपली Plusar रेंजसह 200CC सेगमेंटमध्ये धडाक्यात एन्ट्री केली होती. त्यावेळी Karizma बाइक 223CC क्षमतेसह एअर-कूल्ड इंजिनसह लॉन्च केली होती. खास स्पोर्टी लूक आणि दमदार इंजिनसह ही बाइक तरुणाईमध्ये खूप लोकप्रिय झाली होती. पण पुढे जाऊन घटत्या मागणीमुळे कंपनीनं या बाइकचं उत्पादन बंद केलं होतं. 

नव्या इंजिनसह Karizma मीडिया रिपोर्टनुसार नवी करिझ्मा कंपनी 210CC क्षमतेचं नवं लिक्विड-कूल्ड इंजिन वापरणार आहे. जी ६-स्पीड गियरबॉक्ससह येणार आहे. हे इंजिन जवळपास 26PS ची पावर आणि 30Nm चं टॉर्क जरनेट करण्यास सक्षम असेल. नवी Karizma याआधीच्या मॉडलच्या तुलनेत जास्त पावरफुल असू शकते. याशिवाय बाइकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिविटी, ब्लूटूथ टेक्नोलॉजी, LED लायटिंग इत्यादीचा वापर केला जाऊ शकतो. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्प