भारतीय बाजारपेठेत परवडणाऱ्या 7 सीटर कारला चांगली मागणी असताना टोयोटा आगामी काळात नवीन 7 सीटर कार आणण्याच्या तयारीत आहे. या कारचे नाव टोयोटा रुमियन असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही कार मारुती सुझुकी अर्टिगाची री-बॅज्ड केलेलं व्हर्जन असेल, जी लुक आणि फीचर्समध्ये अर्टिगासारखीच असेल, परंतु ती अधिक पॉवरफुल असू शकते. सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीत रुमियन सादर केली जाऊ शकते. जर तुम्हीही स्वत:साठी नवीन 7 सीटर कार घेण्याचा विचार करत असाल तर प्रथम जाणून घ्या की या MPV मध्ये काय पाहायला मिळेल?
Toyota Rumion MPV च्या लूक आणि डिझाईनबद्दल बोलायचे तर मारुती अर्टिगाच्या तुलनेत काही कॉस्मेटिक बदल केले जातील. Rumion ला री-डिझाइन केलेले ग्रिल, पॉवरफुल बंपर, टोयोटा बॅजिंग, बूडन ट्रिम आणि ब्लॅक इंटिरियर पाहायला मिळेल.
काय असतील फीचर्स ?टोयोटा रुमियनमध्ये Apple CarPlay आणि Android Auto सह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग-माउंट ऑडिओ कंट्रोल्स, रीअर एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह ABS, पार्किंग कॅमेरा आणि मागील पार्किंग सेन्सर्ससह आणखीही फीचर्स दिसून येतील.