शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Flex Fuel Car: पेट्रोल ऐवजी इथेनॉल भरा! देशातील पहिली फ्लेक्स फ्युएल कार लाँच होणार; काऊंटडाऊन सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 13:09 IST

20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल.

पेट्रोल, डिझेलच्या वाढलेल्या किंमतींनी त्रस्त असलेल्या भारतीयांना या महिन्यात मोठी भेट मिळणार आहे. महागडे इंधन भरण्याऐवजी वाहन चालकांना इथेनॉल भरण्याचा पर्याय मिळणार आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी या महिन्यात फ्लेक्स फ्युएलवर चालणार कार लाँच करणार आहे. 

जपानी कार कंपनी टोयोटा आपल्या देशातील पहिली फ्लेक्स फ्यएल कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते लाँच करण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपासून गडकरी फ्लेक्स फ्युएल कारसाठी कार कंपन्यांवर दबाव टाकत होते. यामुळे शेतकऱ्यांनाही मोठी मदत मिळणार असून देशाची अर्थव्यवस्था देखील सुधारणार आहे. 

ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या ६२ व्या वार्षिक अधिवेशनात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. देशातील 35 टक्के प्रदूषण हे पेट्रोल, डिझेल यांसारख्या जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे होते. अशा परिस्थितीत इथेनॉलसारखे इंधन विकसित केले पाहिजे जेणेकरून प्रदूषण कमी होईल आणि त्याच वेळी ते जीवाश्म इंधनांपेक्षा स्वस्त आणि स्वदेशी असेल.

अमित शहा काय म्हणाले...सरकारने 2020 मध्येच फ्लेक्स इंधनाबाबत आपली योजना जाहीर केली होती. 20 टक्के इथेनॉलचे मिश्रण करण्याचे लक्ष्य 2030 पर्यंत ठेवण्यात आले होते, जे नंतर 2025 पर्यंत करण्यात आले. 2025 पर्यंत भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठल्यास, देशाच्या सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच म्हटले आहे. तसेच, आगामी काळात इथेनॉलचे उत्पादन पेट्रोलियम क्षेत्राची संपूर्ण अर्थव्यवस्था बदलेल. 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठल्यास 2025 पर्यंत जवळपास एक लाख कोटी रुपयांच्या परकीय चलनाची बचत होईल.' एथेनॉल म‍िश्रणामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या  किंमतींना लगाम लावण्यासहही मदत मिळेल. 

अमित शाह म्हणाले, कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जैविक इंधन एक चांगला पर्याय आहे. याचे उत्पादन 2011-12 मधील 17.2 कोटी टनावरून वर्ष 2021-22 मध्ये 21.2 कोटी टन झाले आहे. जगभरात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारताने हे साध्य करण्यासाठी स‍िस्‍टिमॅट‍िक आणि वैज्ञानिक इथेनॉल नीती तयार केली आहे.' याच बरोबर, 'एवढे प्रयत्न करूनही, अमेरिका 55 टक्के इथेनॉलचे उत्पादन घेते. ब्राझील 27 टक्के तर भारत तीन टक्के इथेनॉलचे उत्पादन करते, असेही शाह म्हणाले.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल