पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे २०२२ च्या आधी ज्या लोकांना गाड्या घेतल्यात त्यांना जास्त मेंटेनन्स, कमी मायलेज, पिकअप आदी त्रास होत आहेत. हे लोक त्रासलेले असताना ज्या लोकांनी डिझेल गाड्या घेतल्या आहेत ते जादा पैसे मोजून गाड्या घेतल्या तरी खूश आहेत. परंतू, त्यांच्यासाठी एक महत्वाची अपडेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
पेट्रोलमध्ये जसे इथेनॉल मिसळले तसेच डिझेलमध्ये पण मिसळायचे होते. परंतू, प्रयोग अयशस्वी ठरल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे. परंतू,आता सरकार डीझेलमध्ये आयसोब्युटेनॉल मिसळण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे. ते इथेनॉलपासूनच बनते. हे डिझेलसोबत मिसळले जाऊ शकते, असा गौप्यस्फोट गडकरींनी केला आहे.
पेट्रोलमध्ये २० टक्के इथेऩॉल मिसळणे यशस्वी झाल्यानंतर शास्त्रज्ञ डिझेलमध्ये १० टक्के इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग करत होते. परंतू हा प्रयोग फसला आणि डिझेल शुद्धच राहिल्याचे गड़करी म्हणाले. परंतू, इथेनॉलपासून बनणाऱ्या आयसोब्युटेनॉलवर प्रयोग सुरु आहेत. या प्रयोगांच्या निकालावर पुढील दिशा ठरेल असे ते म्हणाले.
गडकरींनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपल्याविरोधात इथेनॉलवरून पेड मोहिम सुरु असल्याचे आरोप केले होते. परंतू, टोयोटा, महिंद्रा सारख्या कंपन्या आपल्या गाड्यांना इथेनॉलचा परिणाम होणार, मायलेज कमी होऊ शकते असे सांगत आहेत. अनेक वाहनमालकांनीही मायलेज घटसल्याचे, मेन्टेनन्स वाढल्याचे दावे केले आहेत.