शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिवाळी बंपर: मारुतीची छप्परफाड ऑफर, या गाड्यांवर भरमसाट डिस्काउंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2017 15:09 IST

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5 हजार रूपयांपासून 50 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरशिवाय अनेक प्रकारची सूट मारूतीकडून देण्यात येत आहे. प्रत्येक शहरासाठी ही ऑफर वेगवेगळ्या प्रकारे लागू असणार आहे. 

मुंबई - भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने सणासुदीचा काळ लक्षात घेऊन मोठ्या डिस्काउंटची ऑफर आणली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 5 हजार रुपयांपासून 50 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरशिवाय अनेक प्रकारची सूट मारुतीकडून देण्यात येत आहे. प्रत्येक शहरासाठी ही ऑफर वेगवेगळ्या प्रकारे लागू असणार आहे. मारुती सुझुकी ऑल्टो 800 आणि ऑल्टो के 10- ऑल्टो 800 वर 20 हजार रुपयांपर्यंत सूट देण्यात येत आहे. याशिवाय हॅचबॅक व्हेरिअंटवर 15 ते 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस देण्यात येत आहे. ऑल्टो के 10 या कारवर ऑल्टो 800 इतकाच एक्सचेंज बोनस मिळत असून 10 हजार रुपयांपर्यंतची सूट देखील मिळत आहे. ऑल्टोच्या एएमटी व्हेरिअंटवर 15 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो.  मारुती सुझुकी वॅगनआर-मारुती 800 आणि ऑल्टो 800 नंतर मारुतीची सर्वाधिक विक्री असलेली कार म्हणजे वॅगनआर.  मारुती वॅगनआर या कारवर तुम्हाला 20 हजार ते 30 हजारापर्यंत कॅश डिस्काउंट मिळू शकतं. मारूती वॅगनआर एएमटी आणि मॅन्युअल व्हेरिअंटवर 20 ते 25 हजारापर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. मारुती सुझुकी सिलेरियो-मारुती सुझुकी सिलेरियोच्या हॅचबॅक व्हेरिअंटवर 30 हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळू शकतं. मारुती सुझुकी सिलेरियोवर 15 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनसही मिळत आहे. या कारच्या  एएमटी व्हेरिअंटवर 22 हजारापर्यंत डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसची ऑफर मिळू शकते. मारुती सुझुकी स्विफ्ट आणि स्विफ्ट डिझायर-मारुतीच्या या लोकप्रिय कारवर तुम्हाला 20 हजारापर्यंत कॅश डिस्काउंट आणि सोन्याचं नाणं मिळू शकतं. याशिवाय 15 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे.  स्विफ्ट डिझायरच्या डिझेल मॉडेलवर 20 हजार रुपयांपासून 22 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट आहे. याशिवाय 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. मारुती Dzire Tour च्या विक्रीवर 20 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट मिळत आहे. मारुती सुझुकी अर्टिगा टी-या गाडीच्या पेट्रोल मॉडेलवर 5 हजार रुपये कॅश डिस्काउंट आहे. याशिवाय 20 हजारापर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर मिळू शकते. डिझेल मॉडेलवर 30 हजार रुपये कॅश डिस्काउंट आणि 20 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळत आहे. मारुती सुझुकी सियाझ-या कारच्या पेट्रोल मॉडेलवर 30 हजारापर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर मिळू शकते. तर डिझेल मॉडेलवर 40 हजारांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 50 हजारांपर्यंत एक्सचेंज बोनस ऑफर आहे.