शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल सेवा बंद, मोटरमनसह रेल्वे कर्मचाऱ्यांचे सीएसएमटी स्थानकात आंदोलन
2
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
3
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
4
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
5
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
6
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
7
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
8
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
9
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
10
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
11
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
12
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
13
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
14
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
15
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
16
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
17
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
18
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
19
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
20
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल

जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:52 IST

फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे. 

ऑटोमोबाईल बाजारात सध्या डिस्काऊंटचा पाऊस सुरु झाला आहे. फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे. 

टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगन, होंडासह सर्वच कार कंपन्यांनी स्टॉक क्लिअरन्स सेल सुरु केला आहे. मारुती नेक्साने इग्निसवर 57 हजार रुपये, बलेनोवर 47 हजार रुपये, फ्रॉन्‍क्‍सवर 78 हजार रुपयांचा डिस्काऊंट जारी केला आहे. Maruti Arena ने Alto K10 वर 52100 रुपये, एस प्रेसोवर 52100 रुपये, वॅगन आरवर 62100 रुपये, स्वि्फ्टवर 57100 रुपयांचा डिस्काऊंट जारी केला आहे. 

होंडाने Elevate वर 1.56 लाख रुपये, सिटीवर 1.52 लाख रुपये, अमेझवर 95,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. टाटा मोटर्सच्या कारवर देखील डिस्काऊंट जाहीर झाला असून ईव्ही सेगमेंटमध्ये टियागो ईव्ही 70,000 रुपये, पंच ईव्ही ६० हजार रुपये, नेक्सॉन ईव्हीवर ३० हजार, तर कर्व्हवर १.३० हजारांचा डिस्काऊंट जारी केला आहे. तर इंधनावरील कार टियागोवर २५००० रुपये, टिगॉर ३० हजार, अल्ट्रॉझ ६५०००, पंच ४० हजार, नेक्सॉन ४५ हजार असा डिस्काऊंट जारी केला आहे. 

जर्मन कंपनी फोक्सवॅगनने प्रीमियम सेगमेंटमधील स्टॉक क्लीअर करण्यासाठी ₹ ३ लाखांपर्यंत मोठी सूट जाहीर केली आहे. Tiguan R Line    ₹ ३,००,००० पर्यंत डिस्काऊंट जाहीर केला आहे. टायगून ₹ १.९५ लाख पर्यंत, Virtus ₹ १.५६ लाख पर्यंत डिस्काऊंट जारी करण्यात आला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Year-End Discounts Surge: Tata, Maruti, Honda & Others Offer Deals

Web Summary : Automobile companies like Tata, Maruti, and Honda are offering year-end discounts to clear stock. Discounts are available on models like Ignis, Baleno, Elevate, and Tiago EV, with Volkswagen offering up to ₹3 lakhs off. Festive season GST cuts boosted sales.
टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीHondaहोंडाVolkswagonफोक्सवॅगन