शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या पाण्यात कार, बाईक बुडालीय; दुरुस्तीची चिंता सतावतेय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 17:22 IST

पुराच्या पाण्यात गाडी किती उंचीपर्यंत बुडाली याचा विचार केला जातो. बंपरपर्यंत, डॅशबोर्ड की टपापर्यंत ही बाब लक्षात घेतली जाते.

मुंबई : महाराष्ट्रात सध्या पूरस्थिती आहे. मुंबईनंतर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, पुणे आदी ठिकाणी पूरस्थिती ओढवली होती. सध्यातर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यामध्ये महापूर आलेला आहे. कोल्हापूरचा रस्ते संपर्कच तुटलेला आहे. पुणे- बंगळुरू रस्त्यावर तर आठ फूट पाणी साचले होते. यामध्ये हजारो गाड्या अडकल्या आहेत. पुराच्या पाण्यात गाडी गेली असेल तर काय करायचे? असा प्रश्न पडला असेल.

महत्वाचे म्हणजे पुराच्या पाण्यात गाडी किती उंचीपर्यंत बुडाली याचा विचार केला जातो. बंपरपर्यंत, डॅशबोर्ड की टपापर्यंत ही बाब लक्षात घेतली जाते. कारचा इन्शुरन्स असल्यास ती कार कंपनीच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्येच न्यावी. कारण कार जर पुराच्या पाण्यात अडकली असेल तर इन्शुरन्समध्ये दुरुस्त करता येते. पण जर मुद्दामहून समोर पाणी दिसत असूनही कार पाण्यात घातली असल्यास कंपनी इन्शुरन्स नाकारते. 

कार पाण्यात गेल्यास तिचे इंजिनामध्ये पाणी जाते. यामुळे इंजिन सीज होते. अशावेळी झिरो डेप इन्शुरन्स असल्यास आणि त्यातही इंजिन प्रोटेक्शन घेतलेले असल्यास आणखी फायद्याचे ठरते. त्याशिवाय कारमधील अन्य इलेक्ट्रीक पार्टही खराब होतात. उदा. म्युझिक सिस्टिम, एसी, अॅटोमॅटीक विंडो, ईसीएम, अॅटो ओआरव्हीएमसारखे पार्ट खराब होतात. 

सर्व्हिस सेंटरचे इन्शुरन्स कंपन्यांशी टायअप असते. शिवाय ओरिजनल पार्टही बदलून मिळतात. सर्व्हिस सेंटर तुमच्या कारची दुरुस्ती करण्याचे इस्टिमेट इन्शुरन्स कंपनीला पाठवते. मात्र, यामध्येही काही अटी आहेत. इन्शुरन्स काढताना कंपन्या तुमच्या कारची आयडीव्ही व्हॅल्यू ठरवितात. ही रक्कम तुमच्या कारच्या वयोमानानुसार ठरते. जर दुरुस्तीची रक्कम या आयडीव्ही व्हॅल्यूच्या 75 ते 80 टक्क्यांपेक्षा जास्त जात असेल तर कंपन्या कार डॅमेज दाखवितात. मात्र, जर ही रक्कम कमी येत असेल तर दुरुस्तीचा क्लेम देतात. 

बाहेरची फिटिंग असल्यास काय?समजा तुमच्याकडे बेस मॉडेल आहे आणि तुम्ही म्युझिक सिस्टिम, कॅमेरा, पार्किंग सेन्सर, फॉग लँप आदी बाहेरून लावून घेतले असतील तर इन्शुरन्स काढतेवेळी त्याची बिले देऊन ती जादा रक्कम भरून इन्शुरन्समध्ये घ्यावी. अन्यथा ती डॅमेज झाल्यास इन्शुरन्समधून त्याचा क्लेम होणार नाही. जर कंपनी फिटेड असल्यास ती इन्शुरन्समध्ये क्लेम होते. काही गॅरेजही इन्शुरन्स क्लेम करून देतात. मात्र, असे गॅरेज ओळखीचे असतील तरच त्यांच्याकडे दुरुस्ती करणे चांगले असते. 

कंपनीने कार डॅमेज केल्यास काय?जर आयडीव्ही व्हॅल्यूपेक्षा कारचा दुरुस्ती खर्च जास्त जात असेल तर कंपन्या कार डॅमेज करतात आणि ती कार स्क्रॅपला देतात. जर तुमच्या कारची आयडीव्ही व्हॅल्यू 6 लाख असेल आणि स्क्रॅपमध्ये या कारला 2 लाखांची किंमत येत असेल तर इन्शुरन्स कंपनी 4 आणि स्क्रॅपचे 2 असे सहा लाख रुपये तुम्हाला दिले जातात. जर तुमचा इन्शुरन्स रिटर्न टू इन्व्हाईस असेल तर आयडीव्ही व्हॅल्यू नाही तर तुमच्या कारची ऑन रोड प्राईस दिली जाते. यामध्ये फक्त इन्शुरन्सचे पैसे मिळत नाहीत. यामुळे इन्शुरन्स घेताना काही हजाराचा विचार न करता योग्य संरक्षण घेणे गरजेचे असते. अन्यथा दोन चार हजारासाठी लाखोंचे नुकसान होते. 

टॅग्स :floodपूरcarकारkolhapurकोल्हापूर