शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
3
बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
4
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
5
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
6
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
7
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
8
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
9
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
10
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
11
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
12
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
13
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
14
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
15
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
16
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
17
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
18
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
19
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
20
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 

कार स्पॉयलर्स - दिखाऊपाणासाठी नव्हे तर हवा कापण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 09:00 IST

कार स्पॉयलर्स हे काही शोबाजीतचे देखाव्याचे साधन नाही. कारला होणारा हवेचा अवरोध कमी करण्याचा तो शास्त्रीय प्रकार आहे. उगाच चांगले दिसण्यासाठी ते लावणअयाने काहीच उपयोग होत नाही

ठळक मुद्देमोटारीला होणारा हवेचा अवरोध कसा कमी होईल,त्यादृष्टीने कार स्पॉयलरची रचना केली गेली.हवेमुळे मोटारीची गती कमी होता उपयोगाची नसल्याने रेसिंग कारसाठी स्पॉयलर्स ही आवश्यक बाब मानली जाते. स्पॉयलरचे वजन किती हवे त्याचाही विचार त्या मोटार उत्पादक कंपन्यांनी केलेला असतो.

कार गतीमान असते, तेव्हा समोरून येणाऱ्या हवेला ती कापत जात असते. ही हवा कापत जाण्याची त्या मोटारीची क्रिया होत असली तरी मोटारीचा आकार त्या हवेला कशा प्रकाराने पार करण्यास मदत करतो तेही महत्त्वाचे असते. ही क्रिया सुलभ व्हावी यासाठी त्या क्रियेमध्ये असणारा मोटारीचा आकार हा अडथळे आणणारा असतो. त्या मोटारीच्या आकाराला आज एरोडायनॅमिक आरेखनाने तयार केले गेले असले तरीही हवेचा हा जोर कमी करण्यासाठी त्याला काही साधन लावता येईल का, मोटारीला होणारा हवेचा अवरोध कसा कमी होईल,त्यादृष्टीने कार स्पॉयलरची रचना केली गेली. पण आज अनेक कारना कार विकत घेतल्यानंतर काहीजण स्पॉयलर्स लावतात. स्वतंत्रपणे लावत असतात. इतकेच नाही तर काही कार उत्पादकांनी इनबिल्ड असे हे स्पॉयलर्स लावून दिले आहेत. परंतु, ते शास्त्रीय कारण लक्षात घेऊन किती लावले गेले आहेत, हा खरा प्रश्न आहे, केवळ शोबाजी करण्यासाठी स्पॉयलर्स लावण्याने काही फरक पडत नाही, किंबहुना त्.याने अडथळाच तयार होऊ शकतो. रेसिंगमधील मोटारींना अशा प्रकारचे स्पॉयलर्स लावले जातात कारण त्यांना हवेचा अवरोध कमी करून गती वाढवायची असते, गती कायम ठेवायची असते. हवेमुळे मोटारीची गती कमी होता उपयोगाची नसल्याने रेसिंग कारसाठी स्पॉयलर्स ही आवश्यक बाब मानली जाते. आज अनेक वाहनांना अशा प्रकारते स्पॉयलर्स लावलेले दिसतात. काही मोटारींना त्यांच्या उत्पादक कंपन्यांकडूनच त्याची रचना केलेली आढळते. अर्थात मोटार उत्पादक कंपन्यांकडून दिलेले हे साधन त्यांच्या आरेखनाच्या दृष्टीने विचार करून बसविलेले असतात. त्या स्पॉयलरचे वजन किती हवे त्याचाही विचार त्या मोटार उत्पादक कंपन्यांनी केलेला असतो. वा करायला हवा. मात्र अनेकदा आपल्या मोटारीला असे स्पॉयलर बसविण्याची कृती केवळ हौस म्हणून करणारे लोक कमी नाहीत. मुळात त्यामागील शास्त्रीय कारण लक्षात घ्यायला हवे. मोटारीचे पंख वाटावेत अशा रेखीव -देखीव विचारांनी स्पॉयलर बसविण्याचे काम छानपणे केलेल्या मोटारी दिसून येत असतात. पण त्या स्पॉयलर्सना काहीच अर्थ नसतो. किंबहुना त्यांच्या अस्तित्वाने अशा मोटारींच्या गतीला बाधा येथे. हवा कापण्याच्या क्रियेतच अडथळा निर्माण होतो. यासाठीच आपल्या मोटारीला रेखीवपणा आणण्यासाठी या स्पॉयलरना बसविणे हे चुकीचे आहे, ही बाब लक्षात घ्यायला हवी. विशेष करून महामार्ग, द्रुतगती मार्ग यावरून मोटारी धावताना साधारण प्रति ताशी ८० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने जात असतात.त्यांना हवेचा होणारा अवरोध कापून पुढे जायचे असते त्यावेळी अशा प्रकारच्या स्पॉयलर्सचा वापर खऱ्या अर्थाने होतो. जोरदार वारा वा वादळ असताना मोटारीला होणारा हवेचा अवरोध हा काहीवेळा चालकाच्यासाठी नियंत्रणाच्या कामात अडथळा आणणाराही ठरू शकतो.तेव्हा या प्रकारचे स्पॉयलर्स नक्कीच उपयुक्त ठरू शकतात. हे स्पॉयलर्स एबीएस प्लॅस्टिक, फायबरग्लास, सिलिकॉन, कार्बन फायबर या मूळ सामग्रीपासून बनविले जातात. या सर्व प्रकारात मोटार उत्पादक कंपन्या एबीएस प्लॅस्टिकपासून तयार केलेले स्पॉयलर्स वापरतात.यामध्ये वापरण्यात येणारी सामग्री काहीशी स्वस्त असली तरी तुटणारी असते. स्पॉयलर हे प्रथमत: अस्तित्वात आले ते व्हेल टेल या नावाने. जणू मोटारीचा शेपटाचा भाग हा व्हेल माशाप्रमाणे वाटावा तो आकर्षक दिसावा यातून व त्याच्या गुणधर्मातून. त्यानंतर डक टेलचा आकार या स्पॉयलरने घेतला. साधारण १९७३ च्या दरम्यान ही स्पॉयलरची कल्पना अंमलात आलेली दिसते. इलेक्ट्रॉनिकद्वारा नियंत्रित करता येणारी ही स्पॉयलरची रचना होती. पोर्शे ९११ या प्रकारच्या मोटारीच्या या टेलने स्पॉयलर्सला फॅशन म्हणून रूढ केले. काही असले तरी मूळ कल्पनेला बगल देणारा शब्द म्हणजे विंग किंवा पंख अशा संकल्पनेतून स्पॉयलरकडे पाहिले गेले. ते चुकीचे वा गोंधळात टाकणारा भाग म्हणावा लागेल. कारण आज खास करून रेसिंग कारसाठी शास्त्रीय तत्त्वातून वापरला जाणारा हा स्पॉयलर टेल या अर्थाने भारतात दिसून येतो. त्याचा वापर येथे प्रवासी वाहनांसाठी किती आवश्यक आहे ती बाब येथील रस्ते व त्यांची स्थिती पाहाता अनाठायी म्हणावी लागेल.