शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

डिसेंबरसाठी कार उत्पादकांनी जाहीर केली भरघोस सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 02:47 IST

सवलतीचे दर ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहतील.

नवी दिल्ली : देशातील आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी डिसेंबर महिन्यासाठी आपल्या विविध कार मॉडेलांच्या किमतीवर भरघोस सूट जाहीर केली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, होंडा, रेनॉल्ट आणि टोयोटा यांचा त्यात समावेश आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमध्ये सर्वोत्तम विक्रीची नोंद करणाऱ्या कार उत्पादन उद्योगाने आता डिसेंबरमध्येही चांगली विक्री व्हावी यासाठी किमतीत सवलती जाहीर केल्या आहेत. सवलतीचे दर ३१ डिसेंबरपर्यंत कायम राहतील.देशातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी असलेल्या मारुतीने ३० हजार ते ५० हजार रुपये या दरम्यान सूट जाहीर केली आहे. वॅगन आर आणि स्विफ्टवर अनुक्रमे ३० हजार आणि ४५ हजारांची सूट आहे. ब्रेझावर ४० हजार, तर डिझायरवर ३५ हजारांची सवलत आहे. एस-प्रेसोवर ५० हजारांची सूट जाहीर करण्यात आली आहे. ह्युंदाईच्या गाड्यांवर ५० हजार ते १ लाख रुपयांची सूट ग्राहकांना मिळणार आहे. सँट्रोवर ५० हजार, ग्रँड आय१० निओस आणि ऑरा यांच्यावर अनुक्रमे ६० हजार आणि ७० हजारांची सूट मिळेल. तीन लाखांपर्यंत मिळणार लाभटाटा मोटर्सने हॅरियर्सवर ८५ हजार, टिॲगोवर २५ हजार, तर नेक्सॉनवर १५ हजारांची सूट जाहीर केली आहे. महिंद्रा ॲण्ड महिंद्राने स्कॉर्पिओवर ३० हजार, तर आल्टरस जी४वर ३,०६,००० रुपये अशी भरघोस सूट दिली आहे. होंडा कार्स इंडियाने ॲमेझवर ३७ हजार आणि सिटीवर ३० हजार रुपये सवलत जाहीर केली आहे. कंपनीच्या सिव्हिकवर सर्वाधिक २,५०,००० रुपयांची सूट देण्यात येत आहे.