शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या गाड्यांच्या बाजारात ऑटोमॅटिक कारची चलती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 05:21 IST

ऑनलाइन कार बाजारस्थळ ‘द्रुम’ने हे सर्वेक्षण केले आहे. देशातील २० हजार डिलर, १.१ अब्ज भेटकर्ते आणि ३.२ लाख विक्री वाहने यांचा डेटा तपासून सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचेन्नई : वापरलेल्या कारच्या (युज्ड कार) बाजारात सध्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या (स्वयंचलित गिअर)  गाड्यांची मागणी प्रचंड वाढलेली आहे. विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गाड्या ऑटोमॅटिक गिअरच्या आहेत, असे एका पाहणीत आढळून आले आहे.२०१६ मध्ये जुन्या कारच्या बाजारात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या गाड्यांची स्वीकारणीयता १७ टक्के होती ती २०२० मध्ये वाढून ३७ टक्के झाली आहे. नव्या कार बाजारात ती केवळ २० टक्केच आहे, हे विशेष.

ऑनलाइन कार बाजारस्थळ ‘द्रुम’ने हे सर्वेक्षण केले आहे. देशातील २० हजार डिलर, १.१ अब्ज भेटकर्ते आणि ३.२ लाख विक्री वाहने यांचा डेटा तपासून सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.‘द्रुम’चे  संस्थापक सीईओ संदीप अगरवाल यांनी सांगितले की, वापरलेल्या वाहन बाजारात मॅन्युअल गिअर आणि ऑटोमॅटिक गिअर या गाड्यांच्या किमतींतील फरक नव्या गाड्यांइतका मोठा नाही. त्यामुळे खरेदीदार ऑटोमॅटिक गाड्यांना प्राधान्य देत आहेत. त्यातही मध्यम आणि उच्च किमतीच्या गाड्यांत ऑटोमॅटिकची विक्री अधिक आहे. कमी किमतीच्या गाड्यांत दोन्ही प्रकारांना समसमान प्राधान्य मिळताना दिसून येत आहे. महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हीलचे सीईओ आशुतोष पांडे यांनी सांगितले की, टिअर-१ आणि टिअर-२ शहरांत सेडान श्रेणीतील ऑटोमॅटिक कारला चांगली मागणी आहे. एसयूव्ही श्रेणीत मात्र मॅन्युअल ट्रान्समिशनला अजूनही मागणी आहे. एसयूव्हीमध्ये अजून ऑटोमॅटिक वाहने मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याचा हा परिणाम आहे. आपल्या संस्थेच्या एकूण विक्रीपैकी २५ टक्के विक्री ऑटोमॅटिक कारची आहे.

मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांत ऑटोमॅटिक गाड्यांच्या विक्रीचे प्रमाण ५० : ५० विभागले गेले आहे. जयपूर, इंदूर, कोइम्तूर, मंगळुरू, अहमदाबाद आणि वारंगळ यांसारख्या शहरांतही दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, पुणे, मुंबई आणि हैदराबाद यांसारख्या मेट्रो शहरांच्या बरोबरीने ऑटोमॅटिक गाड्या विकल्या जात आहेत.

टॅग्स :carकार