शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उद्योगातील मंदी पुढील वर्षी संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 05:09 IST

टोयोटा किर्लोस्करच्या एन. राजा यांचे प्रतिपादन

सोपान पांढरीपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१९ या वर्षात वाहन उद्योगाने गेल्या २० वर्षांतील सर्वात गंभीर मंदी पाहिली. जानेवारी ते नोंव्हेंबर या ११ महिन्यांत वाहनविक्री १५ टक्क्यांनी कमी झाली, पण स्थिती असून, २०२० मध्ये वाहन उद्योगातील मंदी संपेल, असे मत टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपव्यवस्थापकीय संचालक एन राजा यांनी व्यक्त केले.लोकमतच्या मुलाखतील राजा म्हणाले की, अर्थव्यवस्थेतील मंदी बँका व गैरबँकिंग वित्तीय संस्थांनी वाहन कर्ज नाकारणे, जीएसटीबाबत अस्थिरता यामुळे वाहन उद्योगात मंदी तीव्र झाली, परंतु आता विक्री वाढत आहे. गेल्या वर्षी आम्ही १.४५ कार विकल्या होत्या. ती विक्री या वर्षी १.२० ते १.३० लाख झाली. पुढील वर्षी ती १.२० ते १.३० लाख होईल.बंगळुरूजवळ टोयोटा किर्लोस्करचे दोन कारखाने असून, एका कारखान्याची क्षमता एक लाख वाहनांची आहे. तिथे इन्नोव्हा व फॉर्च्युनर मॉडेल्स तयार होतात. दुसऱ्या कारखान्याची क्षमता २.१० लाख वाहनांची आहे. तिथे लान्सर करोला, इटिओस, यारीस इत्यादी मॉडेल्स तयार होतात. याशिवाय जपानमधून पूर्णत: तयार अशा प्राडो लँडक्रूझर व लेक्सस ही मॉडेल्स आयात होतात, असे ते म्हणाले.बॅटरीवर चालणाºया ई-कारबद्दल राजा म्हणाले टोयोटा जवळ हायड्रोजन हायब्रिड (पेट्रोल/डिझेल व गॅसवर चालणारी कार), फक्त बॅटरीवर चालणारी कार व फ्युएल सेलवर चालणारी कार अशी सर्व मॉडेल्स उपलब्ध आहेत. ती भारतातही येतील. टोयोटा आपल्या विक्रेत्यांना खूप मोठा साठा ठेवण्यासाठी बाध्य करत नाही. कंपनी सोबतच विक्रेत्याचीही आर्थिक उन्नती व्हावी असे टोयोटाचे धोरण आहे.बॅटरी कारची घाई नाहीसरकारने २०३० पर्यंत देशात ३० टक्के वाहने बॅटरीवर चालविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तोपर्यंत त्या कार भारतात आणण्याची घाई नाही. आता भारतात कॅमरे हायब्रिड कार आणली आहे, असे सांगून राजा म्हणाले की, बॅटरीवर कार चार्ज व्हायला ६ ते ७ तास लागतात व फ्युएल सेलवर चालणारी कार १० ते १५ मिनिटांत चार्ज होते, परंतु दोन्ही तंत्रज्ञान महाग आहेत.