शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नव्या कोऱ्या रुपात Maruti Suzuki Alto येतेय; जाणून घ्या कधी लाँच होणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 9:26 AM

Maruti Suzuki Alto: देशातील सर्वाधिक खपाची कार म्हणून बिरुदावली मिरवत असलेली मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) लवकरच नव्या रुपात मारुतीप्रेमींसाठी येणार आहे.

सध्याच्या ट्रेंडनुसार इतर कंपन्या कॉम्पॅक्ट एसयुव्हींपासून मोठ्या एसयुव्हींपर्यंत गाड्या बाजारात आणत असताना देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी हॅचबॅक आणि छोट्या कारवर लक्ष केंद्रीत करत आहे. देशातील सर्वाधिक खपाची कार म्हणून बिरुदावली मिरवत असलेली मारुती सुझुकी अल्टो (Maruti Suzuki Alto) लवकरच नव्या रुपात मारुतीप्रेमींसाठी येणार आहे. छोटा आकार, जास्त मायलेज आणि कमी किंमत यामुळे या कारचे प्रत्येक जनरेशनची खुप विक्री झाली आहे. यामुळे कंपनीने या कारचे नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची तयारी केली आहे. कंपनी या वर्षीच्या अखेरपर्यंत अल्टो भारतीय बाजारात लाँच करणार आहे. (Maruti Suzuki Alto facelift will launch soon.)

नव्या अल्टोमध्ये काय बदल?नवीन अल्टोमध्ये अनेक बदल केले जाणार आहेत. जपानच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार नवीन मॉडेल HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारीत असणार आहे. या प्लॅटफॉर्मचा वापर मारुतीच्या वॅगन आर आणि एस प्रेसोमध्ये केला जातो. कारमध्ये 660cc नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 49bhp ताकद तयार करणार आहे. 

अल्टोसोबतच ग्राहकांना नव्या सेलेरिओची देखील प्रतिक्षा आहे. सेलेरिओचे जे फोटो बाहेर पडत आहे त्यावरून सध्याच्या सेलेरिओपेक्षा ही नवी सेलेरिओ थोडी मोठी असणार आहे. यामुळे आधीपेक्षा जास्त स्पेसिअस केबिन मिळणार आहे. तसेच नवीन डिझाईन कारला नवीन फ्रेश लुक देणार आहे. नव्या सेलेरिओमध्ये 1.0 लीटर थ्री सिलिंडर K10B नॅचरली अॅस्पिरेटेड पेट्रोल इंजिन देण्यात येईल. हे इंजिन सध्याच्या सेलेरिओमध्ये वापरले जाते. हे इंजिन 68PS ताकद आणि 90Nm पीक टॉर्क निर्माण करणार आहे. 

नवे रंग, नवे इंजिन! नवी Maruti Suzuki Swift लाँच; मोठमोठ्या SUV चे फिचर्सMaruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करण्यात आले असून, मारुती सुझुकी स्विफ्टचा मिडलाइफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन फ्रंट फॅसिआसह सादर करण्यात आली आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल दिले आहेत. यासह नव्या स्वीफ्टमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. Maruti Suzuki Swift चे थर्ड जनरेशन मॉडेल सन २०१७ पासून भारतात उपलब्ध करण्यात आले आहेत. कारच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले, तर नवीन फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. Maruti Suzuki Swift च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये इंटिरियरमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. आयडॉल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नेक्स्ट जनरेशन के-सीरिज १.२ लीटर ड्युअल जेट डुअल VVT इंजिन देण्यात आले आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती