जीएसटीतील बदलानंतर, आता लहान वाहने खरेदी करणे सोपे झाले आहे. खरेतर, केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेत, वाहनांवरील २८ टक्क्यांचा जीएसटी १८ टक्के केला आहे. जीएसटीचा हा नवा स्लॅब २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होईल. अर्थात, सरकारने दिवाळीपूर्वीच लोकांना मोठे गिफ्ट दिले आहे. आपण मारुती बलेनो खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि जीएसटीचा हा नवा स्लॅब लागू झाल्यानंतर, आपण ती खरेदी केली, तर आपल्यला किती रुपयांचा फायदा होईल? जाणून घ्या...
Maruti Baleno ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6 लाख 74 हजार रुपये एवढी आहे. सध्या या कारची किमतीत 29 टक्के टॅक्स +1 टक्के सेस लागतो. जो 1 लाख 95 हजार 460 रुपये एढा होतो. मात्र, आता या कारवर 19 टक्के टॅक्स आणि 1 टक्का सेस लागेल. यानंतर ही किंमत 1 लाख 28 हजार 60 रुपये राहील. अशा प्रकारे एकूण 67 हजार 400 रुपयांचा फायदा होईल.
Maruti Baleno चं मायलेज - मारुती बलेनोच्या डेल्टा (पेट्रोल + CNG) मॉडेलचे, दोन्ही टँक फूल केल्यास, आपण सहजपणे 1000 किलोमीटरहून अधिक प्रवास करू शकता. फीचर्ससंदर्बात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 9 इंचांचे स्मार्टप्ले स्टूडिओ टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. यात Android Auto आणि Apple CarPlay चा सपोर्ट आहे. याच बरोबर या कारमध्ये Arkamys-सोर्स्ड म्यूझिक सिस्टम, हेड्स-अप डिस्प्ले (HUD), क्रूज कंट्रोल आणि रिअर AC वेंट्ससारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
सेफ्टी फीचर्स -महत्वाचे म्हणजे, सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग, हाइट-एडजेस्टेबल ड्रायव्हर सीट आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. मात्र, हे सर्व अॅडव्हॉन्स फीचर्स टॉप अथवा हाय व्हेरिअंट्समध्ये मिळतात.