शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

कारच्या गतिवरील नियंत्रण हेच वाहनचालकाच्या कौशल्याचे गमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 15:00 IST

कार नियंत्रणासाठी एक्सलरेटरचा वापर कसा करावा ही जाणीव विकसित होणे ड्रायव्हिंगच्या कौशल्य विकासातील एक महत्त्वाचा टप्पा वा गमक म्हणावे लागेल.

ठळक मुद्देवेगावर सुयोग्य व शांत चित्ताने नियंत्रण ठेवणे, समोरच्या रस्त्यावरची स्थिती बघून वेग नियंत्रित करणे करणे आवश्यक आहेसुरक्षित प्रवासासाठी ही अतिशय निकडीची गरज आहे. यासाठी एक्सलरेशन सेन्स तुम्हालाच विकसित करावा लागतो.

आजकाल ड्रायव्हिंग लायसेन्स कोणालाही मिळते, अशी स्थिती आहे. वयाचे १८ वे वर्ष कधी लागत आहे व कधी आपण ड्रायव्हिंग लायसेन्स काढतो, अशी अनेकांची एक तळमळ असते.तरुण पिढीमध्ये वाहनाचे वेड असते मग ते वाहन कार असो की, मोटारसायकल पण लायसेन्स तर पाहिजेच. पण खरं सांगायचे तर नुसती वयाची ही कायदेशीर मर्यादा ओलांडून काही ड्रायव्हिंग येत नसते. ड्रायव्हिंग स्कूलमध्ये अनेक बाबी शिकवत नाहीत, त्या तुम्हाला स्वतःहूनच आत्मसात कराव्या लागतात. शिकाव्या लागतात, जाणून घ्याव्या लागतात.ड्रायव्हिंग हे केवळ स्कील नाही ती एक कला आहे, असे अनेकांचे मत आहे. अर्थात कला नसली फार जमली तरी कौशल्य मात्र प्रत्येकाला नक्कीच आत्मसात करता येऊ शकते. ते आत्मसात करण्यासाठी केवळ कार चालवणे पुरेसे नसते. केवळ कारच्या ऑपरेशन साधनाची माहितीही पुरेशी नसते. तर त्याचा वापर कसा करत आहात, तो कुठे व कोणत्यावेळी कसा करायचा असतो, त्यावर तुमच्या वाहनचालनाचे वा ड्रायव्हिंगचे कौशल्य ठरत असते. कारच्या या ऑपरेशनच्या साधनांमध्ये स्टिअरिंग, गीयर्स, ब्रेक, क्लच,हेडलॅम्पचे स्विचेस, वायपरचे स्विचेस, एक्सलरेटर, हॉर्न अशा विविध साधनांचा वा कळींचा वापर केला जात असतो. त्यातील महत्त्वाचे एक साधन म्हणजे एक्सलरेटर. वेग कमी अधिक करणारे हे साधन.स्कूटर, मोटारसायकल यांच्या एक्सलरेशनसाठी उजव्या हाताला स्टिअरिंग रॉडला असलेल्या मुठीला धरून ती मूठ फिरवून वेग कमी अधिक करता येतो. ती पद्धत वेगळी व कारची पद्धत वेगळी. भारतामध्ये राईट हॅण्ड ड्राईव्ह पद्धतीच्या मोटारी येतील वाहतूक नियमांनुसार तयार केल्या जातात. कारच्या ड्रायव्हिंग आसनापुढे पायाकडील बाजूला उजव्या अंगाला असलेला पायाने दाबायचा दट्ट्या म्हणजे एक्सलरेटर, असे साधे सोपे वर्णन.पण याच दट्ट्याच्या सहाय्याने तुमच्या उजव्या पायाच्या पावलाने कारचा वेग कमी अधिक करता येतो. त्यावर तुमच्या वाहनाचा वेग कमी अधिक करून स्टिअरिंग, गीयर यांच्या सहाय्याने कारची गती नियंत्रित करता येते. वेग कसा वाढवायचा, कसा कमी करायचा, किती जोराने पाय त्या दट्ट्यावर दाबायचा की,हळूहळू त्या दट्ट्यावरचा दाब कमी अधिक करून वेग नियंत्रित ठेवायचे असे सारे काम हा एक्सलरेटर करीत असतो. त्यासाठी तुमचे नियंत्रण हे महत्त्वाचे असते. या दट्ट्याला जोराने दाबत नेले की वेग वाढतो, पण तो कमी करतानाही तुमच्याच आदेशानुसार होतो. या एक्सलरेटरचा पायाला होणारा स्पर्श वा संवेदना व समोर तुम्हाला तुमच्या गाडीचा वेग कमी होत आहे की जास्त हे समजणे जसे गरजेचे असते, की त्याद्वारे तुमची गाडी वेग पकडते.सांगायचा मुद्दा असा की वेग वाढवणे ही क्रिया किती सोपी आहे हे तुम्हाला समजू शकते, पण त्या वेगावर सुयोग्य व शांत चित्ताने नियंत्रण ठेवणे, समोरच्या रस्त्यावरची स्थिती बघून वेग नियंत्रित करणे करणे आवश्यक आहे. वेगावर नियंत्रण ठेवणे व त्यासाठी एक्सलरेशनचा अचूक वापर करणे ही कार ड्रायव्हिंगमधील कौशल्य आत्मसात करण्याची एक पहिली पायरी आहे. ती एकदा ओळखली की कार चालवणे ही कला म्हणून जरी जमले नाही तरी कौशल्य आत्मसात करण्याचा गुण म्हणून मात्र नक्कीच जमू शकेल. वेग वाढवणे सोपे असते, पण तो नियंत्रित ठेवणे व नियंत्रित असणे जास्त गरजेचे असते, इतके ध्यानात ठेवावे. सुरक्षित प्रवासासाठी ही अतिशय निकडीची गरज आहे. यासाठी एक्सलरेशन सेन्स तुम्हालाच विकसित करावा लागतो.