शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

५६ हजार ऑर्डर पेडिंग आणि ९ महिन्यांचं वेटिंग, तरीही ‘या’ कारची लोकांमध्ये मोठी क्रेझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 19:23 IST

या कारला मिळतंय नॉन स्टॉप बुकिंग, पाहा काय आहे यात खास.

मारुती सुझुकी आता एसयूव्ही सेगमेंटमध्ये मजबूत होत आहे. कंपनीकडे New Brezza आणि Grand Vitara या दोन कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहेत. कंपनीच्या या दोन्ही कार्सची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र ग्रँड विटाराला लोकांची अधिक पसंती मिळत आहे. मारुतीने 26 सप्टेंबर रोजी अधिकृतरित्या ही कार लाँच केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे एवढा कालावधी लोटूनही त्याचे बुकिंग संपण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत या कारच्या 56 हजारांहून अधिक ऑर्डर प्रलंबित आहेत. अशातही तुम्ही जर ग्रँड विटारा घेण्याच्या विचारात असाल तर पेंडिंग ऑर्डरसह तुम्हाला 9 महिन्यांच्या वेटिंगचाही विचार करावा लागणार आहे.

मारुती ग्रँड विटाराची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 10.45 लाख ते 19.65 लाख रुपये आहे. भारतीय बाजारपेठेत त्याची स्पर्धा या कारची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, एमजी एस्टर, स्कोडा कुशाक आणि फॉक्सवॅगन टायगुन या कार्सशी आहे. ग्रँड विटारा टोयोटा मोटर कॉर्पोरेशन आणि सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या ग्लोबल अलायन्सच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. भारतीय बाजारपेठेत टोयोटाने या प्लॅटफॉर्मवर आपली अर्बन क्रूझर हायराईडर तयार केली आहे. ग्रँड विटारा आणि अर्बन क्रूझर हायराईड या दोन्ही कार्सचं उत्पादन बिदादी प्लांटमध्ये करण्यात येत आहे.

ग्रँड विटारा स्पेसिफिकेशन्समारुती सुझुकी आणि टोयोटा या दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे Hyrider आणि Grand Vitara विकसित केली आहे. Hyrider प्रमाणेच ग्रँड विटारात माईल्ड हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आले आहे. या कारमध्ये 1462cc K15 इंजिन देण्यात आले आहे जे 6,000 RPM वर सुमारे 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. या शिवाय कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळतो. आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक मायलेज देणारी ही कार आहे.

किती आहे मायलेज

स्ट्राँग हायब्रिड e-CVT- 27.97kmpl

माइल्ड हायब्रिड 5-स्पीड MT - 21.11kmpl

माइल्ड हायब्रिड 6-स्पीड AT - 20.58kmpl

माइल्ड हायब्रिड 5-स्पीड MT ऑल ग्रिप 19.38kmpl

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकार