शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
3
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
4
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
5
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
6
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
7
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
8
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
9
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
10
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
11
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
12
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
13
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
14
शाब्बास..! मुंबई पोलिस, महापालिका, तुम्ही संयम शिकवला !
15
ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी
16
आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!
17
मध्यरात्रीनंतर सोलार एक्सप्लोजिव्हमधील स्फोटांनी हादरले बाजारगाव, एकाचा मृत्यू : १६ कामगार जखमी, चौघे अत्यवस्थ
18
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
19
आजचे राशीभविष्य - ४ सप्टेंबर २०२५, आज यश, कीर्ती व आनंद लाभेल, नोकरीत सहकारी चांगले सहकार्य करतील
20
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...

२७ किमी माइलेज, सनरूफसह ६ एअरबॅग्स; लवकरच लॉन्च होणार TATA ची SUV कार, किंमत आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:16 IST

टेस्टिंगवेळी पूर्णत: झाकलेल्या मॉडेलमध्ये मागील आणि पुढील बाजूस काही कॉस्मेटिक बदल पाहायला मिळाले

टाटा मोटर्स पुन्हा एकदा कॉम्पेक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. २०२५ मध्ये TATA Punch Facelift च्या माध्यमातून कंपनी भारतीय बाजारपेठेत लवकरच ५ स्टार रेटिंग SUV कार लॉन्च करणार आहे. पंच फेसलिफ्टचे फोटो आणि डिटेल्स टेस्टिंगवेळी समोर आले आहेत. त्यामुळे ही SUV कार स्टाईल, सेफ्टी आणि स्मार्ट टेक्नोलॉजीत उत्तम पर्याय म्हणून पुढे येणार आहे.

नव्या टाटा पंच फेसलिफ्ट २०२५ ला टाटाने पंच ईव्हीसारखी डिझाईन दिली आहे. टेस्टिंगवेळी पूर्णत: झाकलेल्या मॉडेलमध्ये मागील आणि पुढील बाजूस काही कॉस्मेटिक बदल पाहायला मिळाले. ज्यातून ही SUV आधीपासून अधिक मॉडर्न आणि युथफूल असल्याचे दिसते. त्यात नवीन फ्रंट बंपर, ग्रिल पॅटर्न, ईव्ही इंस्पायर्ड, एलईडी टेललाईट्स, नव्या डिझाईनवाले अलॉय व्हिल्स मिळण्याची शक्यता आहे.

कसे असेल इंटिरिअर?

इंटिरिअरबाबत बोलायचे झाले तर Tata Punch Facelift ला अधिक स्मार्ट आणि प्रिमियम बनवण्यासाठी त्यात नवीन २ स्पोक लेदरेट स्टिअरिंग व्हिल मिळेल ज्यात टाटाचा एल्युमिनिटेड लोगो मिळेल. त्याशिवाय ७ इंच TFT डिजिटल इन्स्टूमेंट क्लस्टर, १०.२ इंचाची टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Apple Carplay आणि Android Auto, नवीन FATC क्लायमेट कंट्रोल पॅनेल, वायरलेस चार्जिंग, कप होल्डर, फॅब्रिक सीटसारख्या सुविधा मिळतील. डॅशबोर्डचा लेआऊट सध्याच्या मॉडेलसारखाच असेल.

इंजिन आणि परफॉर्मेंस 

या नव्या SUV कारमधील इंजिन आणि परफॉर्मेंसमध्ये काहीही बदल केला नाही. आधीप्रमाणेच यात १.२ लीटर ३ सिलेंडर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह ८६ बीएचपी पॉवर आणि ११३ NM टॉर्क जनरेट दिले आहे. तर CNG प्रकारात ७३.४ BHP पॉवर आणि १०३ NM टॉर्क दिला आहे. त्यात ५ स्पीड मॅन्युअर आणि ५ स्पीड AMT ट्रान्समिशन पर्याय मिळतात. या कारचे कंपनी क्लेम्ड माइलेज पेट्रोलमध्ये २७ किमी आणि सीएनजी २६.९९ किमी प्रतिकिलो इतके देण्यात आले आहे.

सेफ्टी फिचर्समध्येही टाटा पंच फेसलिफ्टला पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षा देण्यात आली आहे. यात GNCAP क्रॅश टेस्टमध्ये ५ स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ६ एअरबॅग्स, रिवर्स कॅमेरा ABS आणि संभाव्यपणे इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फिचर्स दिले आहेत. ही कार भारतात सणांमध्ये लॉन्च केली जाऊ शकते. त्याची एक्स शोरूम प्राईस ६ ते ९.५ लाख इतके आहे. जर तुम्ही १० लाखाच्या किंमतीत एक चांगली SUV कार शोधत असाल ज्यात जबरदस्त माइलेज, प्रिमिअम डिझाईन, सनरूफसह ५ स्टार सेफ्टी मिळेल तर TATA Punch Facelift तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो.  

टॅग्स :Tataटाटा