शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

2021 Honda Amaze Facelift : होंडाची Amaze फेसलिफ्ट लाँच; मारुती डिझायरला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:31 IST

2021 Honda Amaze facelift launched in India:  2021 Honda Amaze तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा कार घेणाऱ्या ग्राहक वर्गाकडे पाहून बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

होंडाने भारतात 2021 Amaze फेसलिफ्ट लाँच केले आहे. या कॉम्पॅक्ट सेदानची सुरुवातीची किंमत 6.32 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेलची किंमत 11.5 लाखांवर जाते. एक्सटिरिअरमध्ये मोठे बदल असले तरी देखील इंटिरिअरमध्ये फार कमी बदल करण्यात आले आहेत. यामुळे तुम्हाला ही कार आतून जुन्या मॉडेलसारखीच वाटणार आहे. 

2021 Honda Amaze तीन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही कार पहिल्यांदा कार घेणाऱ्या ग्राहक वर्गाकडे पाहून बनविण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. यामध्ये E, S, VX व्हेरिअंट आहेत. पेट्रोलमध्ये S, VX व्हेरिअंटमध्ये सीव्हीटी ऑटोमॅटीक गिअरबॉक्स देण्यात आला आहे. डिझेलमध्ये फक्त VX मध्येच CVT  गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 

नव्या अमेझमध्ये 1.2-लीटर i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 89 bhp ताकद आणि 110 Nm चा टॉर्क प्रदान करते. तर .5-लीटर i-DTEC डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 99 bhp ताकद आणि 200 Nm टॉर्क प्रदान करते. 2021 Honda Amaze फेसलिफ्टमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलँप, रिवाईज्ड फ्रंट बंपर, ट्वीड फ्रंट ग्रील, क्रोम सराउंडसोबत फॉग लाईट मिळते. नवीन ड्युअल टोन अलॉय व्हील, क्रोम इन्सर्टसोबत रिअर बंपर आणि सी शेप्ड एलईडी टेल लाईट देण्यात आली आहे. 

आतमध्ये काय बदल...होंडा अमेझमध्ये रिअर व्ह्यू कॅमेरा आहे, डॅशबोर्ड आणि डोअर पॅडसाठी तीन वेगवेगळे व्यू मिळतात. पॅडल शिफ्टर्स, अँड्रॉईड ऑटो, अॅपल कारप्ले आणि इंजिन स्टार्ट, स्टॉप बटन आहे. 

टॅग्स :HondaहोंडाHonda Amazeहोंडा अमेझ