शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा : पदक वितरण सोहळ्यातही गॅटलिनचे हुटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:14 IST

येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १00 मीटरची शर्यत जिंकून वेगाचा नवा राजा बनलेल्या अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनला आनंदाचे क्षण काही उपभोगता येईना झालेत.

लंडन : येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये १00 मीटरची शर्यत जिंकून वेगाचा नवा राजा बनलेल्या अमेरिकेच्या जस्टीन गॅटलिनला आनंदाचे क्षण काही उपभोगता येईना झालेत. शर्यत जिंकल्यानंतर प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली होती. त्याला पदक वितरण सोहळ्यात पुन्हा अपमानाला सामोरे जावे लागले. तो पोडीयमवर आला असता प्रेक्षकांनी पुन्हा हुटिंग केले, तर तिसºया क्रमांकावरील बोल्टचा जयजयकार केला.डोपिंगच्या आरोपाखाली दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून परतलेल्या गॅटलिनने उसेन बोल्टला त्याच्या शेवटच्या शर्यतीत हरवून १00 मीटर स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. या शर्यतीच्या पदक वितरण सोहळ्यात कांस्यपदक मिळवणाºया बोल्टचे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात विजेत्याच्या थाटात स्वागत केले; परंतु सुवर्णपदक विजेत्या गॅटलिनच्या नावाची घोषणा होताच प्रेक्षकांनी जोरदार हुटिंग केले. गॅटलिनचे उपस्थित चाहते मात्र त्याचे टाळ्या वाजवून स्वागत करीत होते. गॅटलिनने हुटिंगकडे दुर्लक्ष करून पोडीयमवर कोणतेही भाव चेहºयावर येऊ दिले नाहीत. तिघांनी सामुदायिक फोटोसेशनही केले. (वृत्तसंस्था)अमेरिकेची बोवी सर्वांत जलद महिला धावपटूअमेरिकेच्या टोरी बोवीने जगातील सर्वांत जलद महिला धावपटूचा सन्मान पटकावला. याबरोबरच तिने गेल्या वर्षी हुकलेल्या आॅलिम्पिकाची कसर भरून काढली. येथे सुरू असलेल्या वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये बोवीने १0.८५ सेकंदांची वेळ नोंदवून हा किताब पटकावला.तिने शेवटच्या सेकंदात आयव्हरी कोस्टच्या मारी जोसी टा लाउ हिला मागे टाकले. शर्यत संपल्यानंतर बोवी ट्रॅकवर कोसळली, तर मारी जोसी जल्लोष करीत होती. परंतु स्क्रिनवर बोवीला विजेती घोषित करण्यात आले. मारी जोसीने १0.८६ सेकंदांची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. नेदरलँडच्या डेफने शिपर्सला १0.९६ वेळेवर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.रिओ आॅलिम्पिकची सुवर्णपदक विजेती अ‍ॅलेन थॉम्पसन पाचव्या स्थानावर राहिली. तिने १0.९८ सेकंदाची वेळ नोंदवली.