शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

जागतिक अ‍ॅथलेटिक्स : फ्रेजर-प्राईस, फेलिक्स यांचा ‘सुवर्ण’ विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 04:24 IST

जमैकाची दिग्गज वेगवान धावपटू शैली आॅन फ्रेजर-प्राईसने १०० मीटरमध्ये अभूतपूर्व असे चौथे जेतेपद पटकावले, तर अमेरिकेची महान धावपटू एलिसन फेलिक्सने उसेन बोल्टचा सुवर्णपदकांचा विक्रम मोडला.

दोहा : जमैकाची दिग्गज वेगवान धावपटू शैली आॅन फ्रेजर-प्राईसने १०० मीटरमध्ये अभूतपूर्व असे चौथे जेतेपद पटकावले, तर अमेरिकेची महान धावपटू एलिसन फेलिक्सने उसेन बोल्टचा सुवर्णपदकांचा विक्रम मोडला. आई झाल्यानंतर विश्व चॅम्पियनशिपमध्ये या दोन्ही खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. एलिसनने १२वे जागतिक सुवर्ण पदक जिंकताना जमैकाचा दिग्गज धावपटू उसेन बोल्टच्या ११ सुवर्ण पदकांचा विश्वविक्रम मागे टाकला.बाळांच्या जन्मानंतर फ्रेजर-प्राईस व फेलिक्स या दोन्ही धावपटू प्रथमच कुठल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या आहेत. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मामुळे २०१७ च्या विश्व चॅम्पियनशिपला मुकलेली ३२ वर्षीय फ्रेजर-प्राईसने १०.७१ सेकंद वेळेसह १०० मीटरचे जेतेपद पटकावले. ब्रिटनची दिना एशर स्मिथने १०.८३ सेकंद वेळेसह रौप्य, तर आयव्हरी कोस्टच्या मेरी जोसे ता लाऊने १०.९० सेकंद वेळेसह कांस्यपदक पटकावले.जमैकाच्या फ्रेजर-प्राईसने यापूर्वी २००९, २०१३ आणि २०१५ मध्येही विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. स्टेडियममध्ये व्हिक्टरी लॅप लगावताना तिचा दोन वर्षांचा मुलगा जियोनही तिच्यासोबत होता. गेल्या नोव्हेंबरमध्ये मुलगी कॅमरिनच्या जन्मामुळे फेलिक्सने जुलैमध्ये १३ महिन्यानंतर पुनरागमन केले होते.दोहामध्ये वैयक्तिक ४०० मीटर स्पर्धेसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेली ३३ वर्षीय फेलिक्सने ४ बाद ४०० मीटर मिश्र रिलेमध्ये सुवर्णपदक पटकावले. अमेरिकेचा संघ ३ मिनिट ९.३४ सेकंदाच्या विक्रमी वेळेसह जेतेपदाचा मानकरी ठरला. (वृत्तसंस्था)टेलरची तिहेरी उडीत जेतेपदाची हॅट््ट्रिकअमेरिकेच्या ख्रिस्टियन टेलरने तिहेरी उडी स्पर्धेत जेतेपदाची हॅट््ट्रिक नोंदवली. दोनवेळची आॅलिम्पिक चॅम्पियन आणि आता चारवेळची विश्व चॅम्पियन २९ वर्षीय टेलरने १७.९२ मीटर अंतरासह सुवर्णपदकावर नाव कोरले. अमेरिकेच्याच विल क्ले (१७.७४ मी.) व बुरकिना फासो की ह्यूज फेब्रिस जांगो (१७.६६ मी.) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.भाला फेकमध्ये अन्नू राणी अंतिम फेरीतभारताची महिला भालाफेकपटू अन्नू राणीने राष्ट्रीय विक्रम नोंदवत अ गटातून अंतिम फेरीत प्रवेश केला. यासह जागतिक स्पर्धेत भालाफेक खेळाची अंतिम फेरी गाठणारी अन्नू पहिली भारतीय महिला ठरली. अन्नूने आपल्या तीन प्रयत्नात ६२.४३ अशी सर्वोत्तम फेक केली. मार्चमध्ये अन्नूने ६२.३४ फेक करुन राष्ट्रीय विक्रम केला होता. लियू शियिंग (६३.४८, चीन) व रतेज मार्टिना (६२.८७, स्लोवेनिया) यांनी अनुक्रमे पहिले दोन स्थान पटकावले.भारताचा मिश्र रिले संघ सातव्या स्थानीभारताचा ४ बाय ४०० मीटर मिश्र रिले संघाने आपली सर्वोत्तम कामगिरी केली खरी, मात्र यानंतरही संघ अंतिम फेरीत सातव्या स्थानी राहीला. मोहम्मद अनस, व्हीके विसमया, जिस्ना मॅथ्यू व टॉम निर्मल नोह यांच्या संघाला ३ मिनिट १५.७७ सेकंद वेळेसह आठ संघाच्या अंतिम फेरीमध्ये सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारतीय संघाने गतवर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना ३ मिनिट १५.७१ सेकंदाची वेळ नोंदवली होती.अनसने आठव्या लेनपासून सुरुवात केली व दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीला विसमया अखेरच्या स्थानापर्यंत गेली. तिसºया टप्प्यात विसमयाकडून बेटन घेताना जिस्नाची दुसºया देशाच्या धावपटूसोबत टक्कर झाली. त्यामुळे महत्त्वाचा वेळ वाया गेला. दरम्यान, त्यावेळी भारतीय संघ अखेरच्या स्थानी होता. नोहने अखेरच्या टप्प्यात पुनरागमन करून दिले, पण भारत केवळ ब्राझीलच्या पुढे सातव्या स्थानी राहिला.अमेरिकेने ३ मिनिट ९.३४ सेकंदाच्या विश्व विक्रमी वेळेसह सुवर्ण जिंकले. या स्पर्धेत प्रथमच मिश्र रिलेचा समावेश केला आहे. जमैकाने ३ मिनिट ११.७८ सेकंद वेळेसह दुसरे, तर बहरीनने ३ मिनिट ११.८२ सेकंद वेळेसह तिसरे स्थान पटकावले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय