शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप : भारताची निराशाजनक सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:19 IST

भारताने विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या

लंडन : भारताने विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या फेरीच्या हिटमध्ये ‘आऊट’ झाले. दुसºया दिवशी शनिवारी सात स्पर्धांच्या हेप्टॅथलॉनमध्ये स्वप्ना बर्मनची कामगिरी निराशाजनक ठरली.पात्रता निकष पूर्ण न करताही कोटा आधारावर स्पर्धेत प्रवेश मिळवणारी दुती महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत पाचव्या हिटमध्ये सहाव्या स्थानी राहिली. तिने १२.०७ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. तिला यंदाच्या मोसमातील वैयक्तिक सर्वोत्तम (११.३० सेकंद) कामगिरीची पुनरावृत्तीही करता आली नाही. तुरळक पावसामुळे ट्रॅक किंचित ओला होता आणि उष्णतामानही २० अंशांपेक्षा कमी होते. ४७ अ‍ॅथलिट््सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दुती ३८ व्या स्थानी राहिली.सहाव्या लेनमध्ये धावणाºया दुतीने सांगितले, की चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्यामुळे पाचव्या लेनमध्ये जर्मन अ‍ॅथलिट ततजाना पिटोला अपात्र ठरविण्यात आल्यानंतर माझ्यावर दडपण आले. दुतीने ११.२६ सेकंद वेळेचा निकष पूर्ण केला नव्हता, पण त्यानंतर सत्रात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे तिला कोटाच्या माध्यमातून स्पर्धेत स्थान मिळवता आले. जर्मनीची जीना लुकेनकेंपर १०.९५ सेकंद वेळेसह अव्वल स्थानी आहे. मारी जोसी तालू व मोरिले अहोरे अनुक्रमे दुसºया व तिसºया स्थानी आहेत. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जमैकाची एलन थॉम्पसन पाचव्या स्थानी आहे.पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत अनस सहाव्या हिटमध्ये होता. अव्वल तीनमध्ये येण्यासाठी त्याला ४५.७० सेकंद वेळेपेक्षा सरस वेळ नोंदवणे आवश्यक होते. त्याने मे महिन्यात दिल्ली येथे ४५.३२ सेकंद वेळेची नोंद केली होती.शर्यतीनंतर प्रतिक्रिया देताना अनस म्हणाला, ‘मी अव्वल तीनमध्ये स्थान मिळवू शकलो असतो, पण अखेरच्या ३०० मीटरमध्ये संधी गमावली. मी सुरुवातीच्या १०० मीटरमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यात सातत्य राखता आले नाही. आता पुढील वर्षी होणाºया राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.’ (वृत्तसंस्था)माझ्या बाजूच्या खेळाडूला अपात्र ठरविण्यात आले. मला अपेक्षित वेगाने पळता आले नाही. त्यामुळे माझी कामगिरी निराशाजनक झाली. वातावरण थंड होते. भारतात वातावरण उष्ण असल्यामुळे चांगली वेळ नोंदवली होती.- दुती चंद

विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप :लंडन : भारताने विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपल्या मोहिमेची निराशाजनक सुरुवात केली. १०० मीटर दौड स्पर्धेत दुती चंद आणि रिले धावपटू मोहम्मद अनस याहया हे खेळाडू पहिल्या फेरीच्या हिटमध्ये ह्यआऊटह्ण झाले. दुसºया दिवशी शनिवारी सात स्पर्धांच्या हेप्टॅथलॉनमध्ये स्वप्ना बर्मनची कामगिरी निराशाजनक ठरली.पात्रता निकष पूर्ण न करताही कोटा आधारावर स्पर्धेत प्रवेश मिळवणारी दुती महिलांच्या १०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत पाचव्या हिटमध्ये सहाव्या स्थानी राहिली. तिने १२.०७ सेकंद वेळेत शर्यत पूर्ण केली. तिला यंदाच्या मोसमातील वैयक्तिक सर्वोत्तम (११.३० सेकंद) कामगिरीची पुनरावृत्तीही करता आली नाही. तुरळक पावसामुळे ट्रॅक किंचित ओला होता आणि उष्णतामानही २० अंशांपेक्षा कमी होते. ४७ अ‍ॅथलिट््सचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दुती ३८ व्या स्थानी राहिली.सहाव्या लेनमध्ये धावणाºया दुतीने सांगितले, की चुकीच्या पद्धतीने सुरुवात केल्यामुळे पाचव्या लेनमध्ये जर्मन अ‍ॅथलिट ततजाना पिटोला अपात्र ठरविण्यात आल्यानंतर माझ्यावर दडपण आले. दुतीने ११.२६ सेकंद वेळेचा निकष पूर्ण केला नव्हता, पण त्यानंतर सत्रात वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे तिला कोटाच्या माध्यमातून स्पर्धेत स्थान मिळवता आले. जर्मनीची जीना लुकेनकेंपर १०.९५ सेकंद वेळेसह अव्वल स्थानी आहे. मारी जोसी तालू व मोरिले अहोरे अनुक्रमे दुसºया व तिसºया स्थानी आहेत. विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन जमैकाची एलन थॉम्पसन पाचव्या स्थानी आहे.पुरुषांच्या ४०० मीटर दौड स्पर्धेत पहिल्या फेरीत अनस सहाव्या हिटमध्ये होता. अव्वल तीनमध्ये येण्यासाठी त्याला ४५.७० सेकंद वेळेपेक्षा सरस वेळ नोंदवणे आवश्यक होते. त्याने मे महिन्यात दिल्ली येथे ४५.३२ सेकंद वेळेची नोंद केली होती.शर्यतीनंतर प्रतिक्रिया देताना अनस म्हणाला, ह्यमी अव्वल तीनमध्ये स्थान मिळवू शकलो असतो, पण अखेरच्या ३०० मीटरमध्ये संधी गमावली. मी सुरुवातीच्या १०० मीटरमध्ये चांगली कामगिरी केली, पण त्यात सातत्य राखता आले नाही. आता पुढील वर्षी होणाºया राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे लक्ष्य आहे.ह्ण (वृत्तसंस्था)माझ्या बाजूच्या खेळाडूला अपात्र ठरविण्यात आले. मला अपेक्षित वेगाने पळता आले नाही. त्यामुळे माझी कामगिरी निराशाजनक झाली. वातावरण थंड होते. भारतात वातावरण उष्ण असल्यामुळे चांगली वेळ नोंदवली होती.- दुती चंद