शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल : देवेंद्र झझारिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:59 IST

देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस झालेला पहिला दिव्यांग खेळाडू देवेंद्र झझारिया याने या पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी ‘खेलरत्न’साठी शिफारस झालेला पहिला दिव्यांग खेळाडू देवेंद्र झझारिया याने या पुरस्कारामुळे पॅरालिम्पिककडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.खेलरत्नसाठी भालाफेकपटू झझारिया आणि माजी हॉकी कर्णधार सरदारसिंग या दोघांच्या नावाची कालच समितीने शिफारस केली होती. पुरस्कारामुळे सुखावलेला झझारिया म्हणाला, ‘१२ वर्षांआधी हा पुरस्कार मिळाला असता तर अधिक आनंद झाला असता.सुरुवातीच्या काळात आम्हाला फार त्रास झाला. त्यावेळी सन्मान मिळाला असता तर आज देशात पॅरालिम्पिकची स्थिती भक्कम झाली असती. उशिरा का होईना पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे. यामुळे पॅरालिम्पिकप्रती आणि दिव्यांग खेळाडूंप्रती लोकांचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होईल.’अथेन्स पॅरालिम्पिक २००४ आणि रिओ पॅरालिम्पिक २०१६ मध्ये विश्वविक्रमासह सुवर्ण जिंकणारा झझारिया ‘खेलरत्न’ मिळविणारा पहिलाच पॅरालिम्पिकपटू आहे. जयपूरच्या साई केंद्रात कोच पदावर असलेला झझारियाने पॅरालिम्पिकमध्ये भारताचे भविष्य उज्ज्वल असून २०२० च्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची पदक संख्या दुहेरी आकड्यात पोहोचेल, अशी आशा त्याने व्यक्त केली. (वृत्तसंस्था)याचे श्रेय आईला !बालपणी आईने माझ्या मनातील न्यूनगंड दूर केला. तिने मला मैदानावर आणले. सुदृढ खेळाडूंच्या तुलनेत तू कुठेही कमी नाहीस, असे नेहमी माझ्या मनावर बिंबवायची. आठ वर्षांच्या वयात झाडावर चढताना विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे झझारियाचा डावा हात खराब झाला. त्यानंतर हात कापण्यात आला होता. इतर मुले टिंगल करतील या भीतीपोटी मी घराबाहेर पडत नव्हतो. आईने मला खेळण्यासाठी प्रोत्साहित केले. अन्य कुणी असते तर जा अभ्यास कर, नोकरी मिळव, असे म्हणाले असते. आईने मात्र मला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. आज मी जो आहे तो आईमुळेच! आईने प्रेरणा दिली नसती तर इथपर्यंत प्रवासही झाला नसता.