शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

अ‍ॅथलेटिक्समध्ये भारत ‘जैसे थे’च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:44 AM

आंतरराष्ट्रीय स्तरावर उसेन बोल्टने अ‍ॅथलेटिक्सला खूप पुढे नेले. पण भारतासाठी जणू वेळ थांबला होता. या खेळात भारताची झोळी खालीच राहिली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर उसेन बोल्टने अ‍ॅथलेटिक्सला खूप पुढे नेले. पण भारतासाठी जणू वेळ थांबला होता. या खेळात भारताची झोळी खालीच राहिली. खेळाच्या इतिहासात महान धावपटू ‘शोमॅन’ बोल्ट याने लंडन विश्वचॅम्पियनशीपमध्ये फिनिशिंग लाईनचे चुंबन घेत खेळातून निवृत्ती घेतली. त्याच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला. ३१ वर्षीय बोल्टने डोप कलंकित या खेळात विश्वासर्हता आणली. त्याची संपूर्ण कारकीर्द डागविरहित राहिली. बोल्टच्या सुवर्णमय करिअरचा शेवट मात्र निराशाजनक ठरला.४ बाय १०० मीटर रिले शर्यती दरम्यान त्याच्या मांसपेशी ताणल्या गेल्या आणि तो स्पर्धेतून बाहेर पडला. आपला अशा प्रकाचा शेवट होईल, याचा विचार बोल्टनेही केला नसावा. त्याला महान बॉक्सर मोहम्मद अलीच्या श्रेणीत ठेवणे वादाचा विषय ठरेल. मात्र, बिजिंग आॅलिम्पिक २००८ नंतर जमैकाच्या या धुरंधराने वेग आणि चमत्काराने खेळ जगताला जिंकून घेतले.>शॉटपूटमध्ये मनप्रित कौर दोन वेळा पॉझिटिव्ह आढळली. त्यामुळे भुवनेश्वर येथे तिने मिळवलेल्या आश्यिाई चॅम्पियनशीप शानदार प्रदर्शनाची चमक कमी झाली.>दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून भारताची अ‍ॅथलेटिक्स ही ताकद राहिली आहे. भुवनेश्वर येथील आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चीनला मागे टाकत भारताने अव्वल स्थान गाठले हेच या वर्षीचे भारताचे सर्वात मोठे यश म्हणता येईल.भारताचा विचार केला तर अ‍ॅथलेटिक्समध्ये विशेष यश मिळवले नाही.अंजू बॉबी जॉर्जने २००३ मध्ये पॅरिस विश्व चॅम्पियनशीमधील लांब उडीत मिळ्वलेले कांस्यपदक सोडले तर भारताच्या झोळीत पदक पडले नाही.लंडन येथे भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा याच्याकडून पदकाची आशा होती. मात्र, ज्युनियर गटात विश्वविक्रम नोंदवणारा नीरज अंतिम फेरीतही पोहचू शकला नाही.देविंदर सिंग हा डार्कहार्स निघाला. त्याने अंतिम फेरी गाठली होती, मात्र गांजा सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळल्याने त्याचे संघात निवड होणे संशयास्पद होते. भारताचा गोविंद लक्ष्मणनने ५ हजार मीटर शर्यतीत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.