हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. प्रेमीजनांसाठी महिना खूपच त्रासदायी ठरणार आहे. कदाचित त्यांचे नाते तुटू सुद्धा शकते. विवाहितांना आपल्या नात्यांकडे थोडे जास्त लक्ष द्यावे लागेल. कामाच्या व्यस्ततेमुळे एकमेकांना वेळ देऊ न शकल्याने भांडण होण्याची संभावना आहे. ह्या महिन्यात आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. ह्या महिन्यात प्राप्तीत वाढ होणार असून जर अचानकपणे एखादा खर्च उभा राहिला तर तो आपण सहजपणे करू शकाल. व्यापाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. बाजारात त्यांची एक नवीन ओळख निर्माण होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती पदोन्नतीमुळे उत्साहित होतील. त्यासाठी ते आपल्या वरिष्ठांशी सुद्धा बोलणी करू शकतात. विद्यार्थ्यांना इतर प्रवृत्तीत मजा आली तरी त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अभ्यासावर होईल. चांगले परिणाम मिळविण्यासाठी त्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. ह्या महिन्यात कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवणे उपयुक्त ठरेल. आपण जर तणावाखाली वावरत असाल तर कुटुंबियांच्या सहवासात राहून तो सहजपणे दूर होऊ शकेल. आरोग्य विषयक समस्या असल्यास एखाद्या निष्णात डॉक्टरां कडून उपचार करून घ्यावेत. योगासन व व्यायामास आपल्या दैनंदिन कार्यक्रमात समाविष्ट करावे.