शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
3
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
4
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
5
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
6
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
8
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
9
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
10
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
11
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
12
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
13
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
14
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
15
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
16
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
17
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
18
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
19
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
20
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती

आचारसंहितेपूर्वी झेडपीतील भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:47 IST

जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतिप्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, असे संकेत १३ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील चर्चेच्या वेळी मिळाले. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. राज्यात सर्व जिल्हा परिषदांमधील लेखी परीक्षेचे वेळापत्रक सारखे राहणार आहे.

ठळक मुद्देप्रश्नपत्रिका राज्यस्तरावर : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सचिवांचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतिप्रक्रिया लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी होईल, असे संकेत १३ डिसेंबर रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील चर्चेच्या वेळी मिळाले. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका काढण्यात येणार आहेत. राज्यात सर्व जिल्हा परिषदांमधील लेखी परीक्षेचे वेळापत्रक सारखे राहणार आहे.ग्रामविकास विभागाचे सचिव असीमकुमार गुप्ता यांनी जिल्हा परिषदांकडे भरतीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेतून मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सानप यांच्यासह ११ विभागांचे खातेप्रमुख आदींनी सहभाग घेतला होता. रिक्त पदे, पदांची बिंदूनामावली (रोस्टर) मराठा आरक्षणासह तयार केली. बिंदूनामावली तपासणीसाठी मागासवर्ग कक्षाकडे पाठविणे यासंदर्भात आढावा घेतला. कर्मचारी भरतीच्या हालचाली जोरात सुरू आहेत.जिल्हा परिषदेकडील २३ संवर्गातील रिक्त पदांची माहिती शासनास सादर केली जाणार आहे. याअनुषंगाने ३१ डिसेंबर २०१८ अखेर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१९ या पुढील वर्षाच्या कालावधीत सर्वसाधारण क्षेत्रात २५७ आणि पेसा क्षेत्रात २४५ अशी ५०२ पदे रिक्त आहेत. यामध्ये २० टक्के पदे ही ग्रामपंचायत कर्मचारी व अनुकंपा संवर्गातून भरली जाणार आहेत. नियमानुसार या जागा वगळून इतर रिक्त असलेल्या व पुढे रिक्त होणारी पदे संवर्गनिहाय आहेत.डिसेंबर २०१९ अखेर संवर्गनिहाय रिक्त पदेऔषधनिर्माण अधिकारी, आरोग्यसेवक पुरुष, आरोग्यसेवक महिला, कनिष्ठ आरेखक, अंगणवाडी पर्यवेक्षिका, वरिष्ठ सहायक लिपिक, पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता बांधकाम, कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विस्तार अधिकारी शिक्षण, विस्तार अधिकारी सांख्यिकी, कंत्राटी ग्रामसेवक, स्थापत्य अभियंता यांसारखी पदे रिक्त आहेत.भरतीसाठी जाहिरात लवकरचलोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कर्मचारी भरतीचे संकेत ग्रामविकास विभागाच्या सचिवांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये दिल्याची माहिती जिल्हा परिषदेतून मिळाली. लेखी परीक्षेसाठी राज्यस्तरावर प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे. राज्यात एकाच वेळी परीक्षा होईल, असे संकेतही देण्यात आले. भरतीसाठी जाहिरात जिल्हास्तरावरून लवकर प्रसिद्ध होईल, असे संकेत मिळत आहेत.