शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

झेडपी, महापालिका निवडणूक फेब्रुवारीत ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2016 01:44 IST

मुंबईसह राज्यात १० महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत आहे.

निवडणूक आयोग : मतदान तारखेत आठ दिवसांचा फरक अमरावती : मुंबईसह राज्यात १० महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारी २०१७ च्या दुसऱ्या आठवड्यात होण्याचे संकेत आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही निवडणुका एकाच दिवशी घेण्याबाबतच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप - शिवसेनेने प्रस्थापित पक्षांना हादरे देत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. येत्या वर्षात जिल्हा परिषद, महापालिकांचा सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. भाजप- सेना हे दोन्ही मित्र पक्ष जिल्हा परिषद, महापालिका निवडणूक वेगवेगळे लढणार असल्याने त्यादिशेने नेत्यांनी वाटचाल चालविल्याचे चित्र आहे. दुसरीकडे भाजपने महापालिका, जिल्हा परिषदेवर ‘कमळ’ फडकाविण्याचा मानस व्यक्त केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा ताब्यात घेऊन भाजपचा झेंडा गाव-खेड्यात पोहचविण्याची रणनिती आखली जात आहे. राज्यात युती सत्तेत येण्यापूर्वी नगरपरिषद, नगरपालिकांवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. मात्र केंद्र सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. यादरम्यान नागरिकांना झालेला मन:स्ताप बघता नगरपरिषदांच्या निवडणुकीत भाजप, सेनेला अपयश येईल, असा अंदाज काँग्रेस आघाडीला होता. मात्र नगरपरिषद निवडणुकांचा निकालानंतर भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष उद्यास आला आहे. प्रत्यक्षात नगरपरिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपचा ६४ ठिकाणी झेंडा फडकला आहे. काँग्रेस ३३ तर सेना २६, राष्ट्रवादी काँग्रेसला २१ नगरपरिषदांवर झेंडा फडकविता आला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचेच सर्वांधिक १०९० तर काँग्रेस ८९४, राष्ट्रवादी ७८६ तर शिवसेनेचे५९८ नगरसेवक विजयी झाले आहेत. नोटबंदीचा त्रास होत असताना मतदारांनी भाजपच्या पारड्यात वजन टाकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. अशातच २४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाचे भूमिपूजन केले असून याचे नागरिकांच्या मनात सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका ‘कॅश’ करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी मोर्चेबांधणीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद, महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारी २०१७ मध्ये होईल, यात दुमत नाही. मात्र निवडणूक मतदानाच्या तारखेत सात, आठ दिवसांचा फरक राहील, असे अपेक्षित आहे. शेवटी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल. - गजेंद्र बावने, जिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती