शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी, पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

अमरावती : जिल्हा परिषदेच्या तीन पंचायत समितीच्या दोन रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीच्या हालचाली ...

अमरावती : जिल्हा परिषदेच्या तीन पंचायत समितीच्या दोन रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने त्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या असून, जिल्हा पातळीवर मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेचे सदस्य बळवंत वानखडे व देवेंद्र भुयार हे जण विधानसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून विजयी झाले आहे. त्यामुळे दर्यापूर तालुक्यातील गायवाडी व वरूड तालुक्यातील बेनोडा या दोन जिल्हा परिषद सर्कलच्या जागा रिक्त आहेत. याशिवाय बांधकाम सभापती प्रियंका दगळकर यांचे अलीकडेच निधन झाल्याने धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव झेडपी सर्कलची जागा रिक्त झाली. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ सदस्यीय सभागृहात ५६ सदस्यच आहेत. या रिक्त जागांसाठी लवकरच निवडणूक घेतली जाणार आहे. याशिवाय अमरावती पंचायत समितीतील वलगाव गणाची तसेच अचलपूर तालुक्यातील कांडली गणाची जागा रिक्त आहे. त्यामुळे या दोनही पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठीसुध्दा निवडणूक घेतली जाणार आहे. या पाचही मतदारसंघाची निवडणूक या मतदार यादीच्या आधारे घेतली जाणार आहे. या रिक्त जागांकरिता निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने यासाठीची मतदार यादी १८ फेब्रुवारीला जाहीर केली जाईल. २६ फेब्रुवारीपर्यंत सूचना व हरकती मागविल्या जातील. त्यानंतर ५ मार्चला अंतिम व १० मार्चला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी घोषित केली जाईल. ही मतदार यादी जाहीर होताच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता सूत्रांनी वर्तविली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळातही या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत.

बॉक्स

मतदार यादीनंतर निवडणूक कार्यक्रम

एरवी अंतिम मतदार यादीची घोषणा होण्याच्या दिवशी निवडणूक कार्यक्रम घोषित केला जातो आतापर्यंतच्या निवडणुका या क्रमाने झाले आहेत. त्यामुळे यावेळीही तसेच होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसे झाल्यास जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम ५ मार्च रोजी घोषित होऊ शकतो.