शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जिल्हा परिषद जलसंधारण कामाच्या अधिकारावर टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:15 IST

अमरावती : राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच हे सरकार जिल्हा परिषदांचे महत्त्व कमी करीत आहे, असा ...

अमरावती : राज्यात भाजप-सेना युती सरकार सत्तेत असताना नेहमीच हे सरकार जिल्हा परिषदांचे महत्त्व कमी करीत आहे, असा आरोप तत्कालीन विरोधकांकडून होत होता. मात्र, सत्तेत येताच आरोपाचा विसर पडलेल्या विद्यमान राज्यकर्त्यांकडूनही तोच कित्ता गिरविला जात आहे. जिल्हा परिषद लघु पाटबंधारेच्या अखत्यारीतील कुठल्याही प्रकल्पावर अन्य यंत्रणेला काम करायचे असल्यास ना हरकत (एनओसी) बंधनकारक होते; परंतु ही अट काढून वगळून जलसंधारणाला राज्यस्तरावर रान मोकळे करून दिले आहे. हाही प्रकार झेडपीच्या अधिकारावर गदा आणणारा आहे.

जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील लघु मध्यम प्रकल्पासोबतच पाझर तलाव, साठवण तलाव, तसेच कोल्हापुरी बंधाऱ्यांची संख्या मोठी आहे. असे असतानाही राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या जलसंधारण विभागाने निधी देताना जिल्हा परिषदेपेक्षा जलसंधारणला अधिक झुकते माप दिले आहे. याशिवाय झेडपीच्या अधिकार क्षेत्रातही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या प्रकल्पांच्या अन्य कोणत्याही यंत्रणेला काम करायचे असल्यास झेडपीचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक होते. त्यामुळे खरोखरच कोणत्या प्रकल्पाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे, कोणत्या प्रकल्पाचा किती निधी लागणार आहे, यासह आदी बाबींची तपासणी करून ना हरकत दिले जात होते; परंतु गत १७ फेब्रुवारी रोजी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने जारी केलेल्या निर्णयानुसार आता जलसंपदा विभाग, पाणी पुरवठा विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषद यांच्या अखत्यारीतील ० ते ६०० हेक्टर सिंचन क्षमतेच्या मर्यादेतील सर्व प्रकल्पांची दुरुस्ती जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग (राज्यस्तर) यांच्या मार्फत पूर्ण करण्यात येणार आहे. या विशेष दुरुस्तीसाठी संबंधित यंत्रणेच्या एनओसी प्रमाणपत्राची आवश्यकता राहणार नाही. असे या आदेशात म्हटले आहे. अशातच झेडपीकडे पुरेसे मनुष्यबळ असताना मात्र झेडपीच्या सिंचन प्रकल्पावर जलसंधारण राज्यस्तर विभागाची यंत्रणा काम करण्यासाठी दिलेला अधिकार हा झेडपीवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या धोरणाला झेडपी आमसभेत विरोध करीत पूर्वीप्रमाणेच कामे झेडपीकडेच सुरू ठेवावीत अशा आशयाचा ठराव २२ फेब्रुवारी रोजीच्या आमसभेत पारित केला आहे.