शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा २० कोटींचा निधी परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:10 IST

ग्रामीण भागातील विकासकामांसाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षातील जवळपास २० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनतिजोरीत परत पाठविण्यात आला आहे.

ठळक मुद्देशासन तिजोरीत जमा : विहित मुदतीत खर्च करण्यात अपयश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामीण भागातील विकासकामांसाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सन २०१७-१८ या वर्षातील जवळपास २० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याने तो शासनतिजोरीत परत पाठविण्यात आला आहे.बांधकाम विभागाचे सर्वाधिक १३ कोटी ४२ लाख, पंचायत विभागाचे ६ कोटी ५० लाख, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे १ कोटी २० लाख रुपये आणि महिला-बाल कल्याणचे ७६ लाख असा जवळपास २० कोटी ३८ लाख रुपयांचा निधी हा विहित मुदतीत म्हणजे दोन वर्षात खर्च होऊ शकला नाही. त्यामुळे सदरचा निधीची रक्कम शासन याकडे परत करण्यात आली आहे. शासनाकडून विविध लेखाशीर्षांतर्गत जिल्हा परिषदेला ग्रामीण भागातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध केला जातो. सदर निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषदेला दोन वर्षाची कालमर्यादा आहे. परंतु, दोन वर्षात तरी सदर निधी खर्च न झाल्याने तो शासनतिजोरीत परत पाठविणे आवश्यक आहे.जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेनंतर कोट्यवधीचा निधी शासनस्तरावरून विकासकामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. परंतु, सदरचा कोट्यवधीचा निधी हा तांत्रिक अडचण आणि समन्वय नसल्याने विहित मुदतीत खर्च करता आला नसल्याचे वास्तव आहे.कसा होईल विकास ?जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला आता जवळपास दोन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, सभागृहाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य नेहमीच विकासनिधीसाठी ओरड करीत असतात. निधी नाही; विकासकामे कशी करायची, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधीत्व करून काय उपयोग, अशा प्रतिक्रिया सदस्यामधून ऐकायला मिळतात.परंतु, कोट्यवधीच्या विकासकामांचा निधी परत गेला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामांसाठी तांत्रिक अडचणी व समन्वय साधूनच विकासाची गंगा प्रत्येक जिल्हा परिषदेच्या सर्कलमध्ये वाहू शकते. त्यासाठी प्रयत्न अपेक्षित आहेत.जिल्हा परिषदेमार्फ त विकासकामे करताना सुरुवातीपासूनच विरोधकांनी विकासकामात अडचणी आणून जिल्ह्याच्या ती रोखून धरली. त्यामुळे हा निधी खर्च आला नाही. परिणामी हा निधी नाइलाजास्तव शासनाकडे परत गेला.- नितीन गोंडाणे, अध्यक्षविकासाचा दृष्टिकोन नसल्याने व नियोजनाअभावी नियमबाह्य कामे प्रशासनाने होऊ दिली. एवढा मोठा निधी परत जाण्यास सत्ताधारी पक्षच जबाबदार आहे. मात्र, याचे खापर विरोधकांवर फोडून आपला बचाव करण्याची ही खेळी आहे.- रवींद्र मुंदेविरोधी पक्षनेता

टॅग्स :zpजिल्हा परिषद