शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 00:08 IST

भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली.

ठळक मुद्देशिवसैनिकांचा ठिय्या : बीडीओ मारहाण प्रकरण

आॅनलाईन लोकमतअमरावती : भातकुलीच्या बीडीओला मारहाण करणाºया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. माहिती मिळताच शिवसेना कार्यकर्त्यांसह जि.प. अध्यक्ष व अन्य पदाधिकाऱ्यांनी ठाण्यात धाव घेतली. उपाध्यक्षांना जि.प. अध्यक्षांच्या कक्षातून दुपारी ताब्यात घेण्यात आले. न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.ढोमणे यांना अटक करण्यात येऊ नये, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकाºयांनी पोलिसांना विनंती केली. मात्र, गाडगेनगर पोलीस त्यांच्या अटकेवर ठाम राहिल्याने काही शिवसैनिकांसोबत पोलिसांची शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान बीडीओ सागर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, शहरप्रमुख प्रशांत वानखडे, सहसंपर्कप्रमुख सुधीर सूर्यवंशी, आशिष धर्माळे यांनी गाडगेनगर ठाण्यात ठिय्या दिला. चर्चेअंती पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करायचा की कसे, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असा पवित्रा गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घेतला. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी मागे फिरलेत.ढोमणे यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी रात्री भादंविच्या कलम ३५३, ५०४, ५०६, ३२३, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बीडीओ सागर पाटील यांना त्यांच्या कार्यालयात शिरून मारल्याचा आरोप ढोमणे यांच्यावर आहे. गुरुवारी महसूल अधिकारी कर्मचाºयांनी पाटील यांच्या समर्थनार्थ बंद पुकारल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांवर दबाव आला होता.जिल्हा परिषदेत खळबळजि.प. उपाध्यक्षांना अटक करण्यासाठी गुरुवारी पोलीस जिल्हा परिषदेत दाखल झाले. याची कुणकुण शिवसेना पदाधिकाऱ्यांना लागताच त्यांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. दत्ता ढोमणे यांना अटक करण्यास सुरुवातीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शविला. पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्यांनी हुज्जत घातली. त्यामुळे काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान बीडीओंनी ३५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप सुधीर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.जि.प.उपाध्यक्ष दत्ता ढोमणे यांना गुरुवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने एमसीआर सुनावला. शिवसैनिकांच्या तक्रारीवरुन बीडीओंविरुद्ध गुन्हा नोंदविलेला नाही.- मनीष ठाकरे,ठाणेदार, गाडगेनगर