शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जिल्हा परिषदेत जेममार्फत साहित्य खरेदीचे धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 22:27 IST

सरकारी कार्यालयांनी संस्थांमधील काही वस्तूंच्या खरेदी दरम्यान होणारा भ्रष्टाचार टाळण्याकरिता राज्य शासनाने जेम (गर्व्हमेंट ई-मार्केट प्लस) या आॅनलाईन पोर्टलची निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देनवे पोर्टल : ग्रामपंचायतींनाही खरेदीच्या सूचना

जितेंद्र दखने ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सरकारी कार्यालयांनी संस्थांमधील काही वस्तूंच्या खरेदी दरम्यान होणारा भ्रष्टाचार टाळण्याकरिता राज्य शासनाने जेम (गर्व्हमेंट ई-मार्केट प्लस) या आॅनलाईन पोर्टलची निर्मिती केली आहे. सगळ्या प्रकारची खरेदी या पोर्टलवरूनच करायची, असा फतवा जाहीर केला आहे. परंतु ही वेबसाईट मागील किमान महिनाभर बंद होती. त्यामुळे जिल्हा परिषद यंत्रणेची डोकेदुखी वाढली होती.मागील आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला जेमद्वारे एकही खरेदी करण्यात यश आले नव्हते. जिल्हा परिषदेचा वर्ष २०१७-१८ कोट्यवधींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा ९३ लाख २२ हजार रूपये शिल्लकीचा अंदाजपत्रक सादर झाला. गतवर्षी डीबीटी, जीएसटीसह अनेक नवीन धोरणांचा स्वीकार शासनाकडून करण्यात आला. त्यामुळे नव्याने निश्चित केलेल्या निकषाच्या आधारे योजना राबविताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. डीबीटीमुळे २५ ते ३० टक्के निधी शिल्लक राहिला, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. जीएसटी लागू करावा लागल्याने बांधकाम विभागातही काही निधी शिल्लक राहिल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. समाजकल्याण विभागातील यांच्या बदलीमुळे व नवीन अधिकारी रूजू झाल्यामुळे येथील कामावर परिणाम झाला. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात विभागप्रमुखांनी सुटी घेतली नव्हती, त्यांनी रात्री उशिरापर्यंत काम करून सर्व फायलींचा निपटारा केला. सुटीच्या दिवशीही अधिकारी कामावर होते. तरीसुद्धा सारखे ७० टक्के निधी खर्च झाला. पशुसंवर्धन विभागाचा शंभर टक्के निधी खर्च झाला. बांधकाम लघुसिंचन, कृषी, आरोग्य व इतर विभागाचा समावेश आहे.ग्रामपंचायतींची अडचणग्रामपंचायतीमधील सर्व साहित्य खरेदी गव्हर्न्मंेट ई-मार्केटिंगच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील कामे खोळंबली आहे. ग्रामपंचायतीमधील सर्व खरेदीही स्थानिक स्तरावरून करण्यात येते. मग लाईट असो किंवा इतर छोट्यमोठ्या वस्तूंची खरेदी असो. तीन कोटेशन मागवून त्यापैकी सर्वात कमी किंमत देणाऱ्या व्यक्तींकडून खरेदी करून वेळ भागविण्यात येते. परंतु आता केंद्र सरकारने देशभरातील ग्रामपंचायतींमधील साहित्य खरेदी करण्याचे कामही एका खासगी कंपनीला दिले आहे. ग्रामपंचायतीला जर दोन लाईट घ्यायचे असतील तर गव्हर्मंेट.ई मार्केटिंगच्या अ‍ॅपच्या माध्यमातून मागणी करावी लागते. त्यामुळे ग्रामपंचायतीची चांगलीच अडचण झाली आहेराज्य शासनाने जेम या आॅनलाईन पोर्टलची निर्मिती केली आहे. सगळ्या प्रकारची खरेदी या पोर्टलवरूनच कराव्यात, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेतील खरेदीची प्रक्रिया जेममार्फत केली जात आहे.- कै लास घोडके, डेप्यूटी सीईओ