उपक्रम : गावागावात करणार स्वच्छतेची जनजागृतीअमरावती : दरवर्षी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने स्वच्छता दिडींचे आयोजन केले जाते. या उपक्रमात बुधवारला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा स्वच्छता विभागाची स्वच्छता दिंडी पंढरपूरला रवाना झाली. या दिंडीला अध्यक्ष सतीश उईके, सीईओ सुनील पाटील यांनी हिरवी झेंडी दाखवीली. राज्यातील चार विभागातील सर्र्व जिल्हे तर अमरावती विभागातून केवळ अमरावती वाशिम आणि अकोला या तीन जिल्हा परिषदेची स्वच्छता दिंडी यामध्ये सहभागी होणार आहेत. ही दिंडी मार्गावरील प्रत्येक गावात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. या स्वच्छता दिडींत स्वच्छतेविषयक जनजागृती करण्यासाठी सजविलेले वाहने, ध्वनी यंत्रणा, नाटय कलावंत आणि कलापथक सहभागी झाले आहे. ही दिंडी १ जुलै रोजी पूणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी ८ वाजता पोहचणार आहे. या दिंडीचे स्वागत पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर हे करणार आहे. तर १४ जुलै रोजी पंढरपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.बुधवारी जिल्हा परिषदेच्या आवारात बालगंधर्व बहूउद्देशिय संस्थेच्या कलापथकाने स्वच्छतेवर आधारित नाटिका सादर करून महत्व पटवून दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, सदस्य रविंद्र मुंदे, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, श्रीपाल पाल, सुधीर सुर्यवंशी, वनमाला खडके, उमेश केने, प्रवीण घुईखेडकर, सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ संजय इंगळे, जे.एन आभाळे, समाज कल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी श्रीकांत मेश्राम, प्रदीप बद्रे, निलेश नागपूरकर, दिनेश घाडगे, प्रशांत सातव आदी उपस्थित होते. यानंतर अमरावती जिल्हा परिषद अध्यक्षांच्या उपस्थितीत या स्वच्छता दिंडी रथाला निरोप देण्यात आला. आषाडी पौर्णिमेच्या सोहळ्या लाखो भाविक सहभागी होतात. त्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देणार आहे. (प्रतिनिधी)
पंढरीला निघाली जिल्हा परिषदेची स्वच्छता दिंडी
By admin | Updated: June 30, 2016 00:10 IST