शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीला मिळाला ‘माझी कन्या भाग्यश्री’चा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:33 IST

महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ५७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ८१ लाख २५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे. या योजनत तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देकन्यांचे भाग्य उजळणार : लाभार्थ्यांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिला व बालविकास विभागाने सुरू केलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत ५७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यासाठी राज्य शासनाकडून ८१ लाख २५ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे आला आहे. या योजनत तालुक्यांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे.मुलींच्या आरोग्य व शिक्षणात सुधारणा करणे, त्यांच्या भविष्यासाठी आर्थिक तरतूद यासह बालिका भ्रूणहत्या रोखण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.मुलांच्या तुलनेत मुलींचे जन्मदर कमी आहे. मुलींचा टक्का वाढावा यासाठी शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली आहे. योजनेअंतर्गत एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट केले जाते. तर दोन मुलींवर कुटुंबनियोजन केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये डिपॉझिट केले जाते. एका मुलीवर कुटुंबनियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांची संख्या केवळ ५ आहे. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थ्यांची संख्या ५६७ आहे. त्यानुसार उपलब्ध निधीतून पहिल्या टप्प्यात ३२३ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. यामुळे लाभार्थींची प्रतीक्षा आता संपणार आहे.लाभार्थ्यांच्या नावे ही रक्कम फिक्स डिपॉझिट करण्यात येणार आहे. याबाबत बँकेकडून मिळालेले प्रमाणपत्र लाभार्थ्यांना दिले जाणार आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पालकांनी लाभ घ्यावा.- प्रशांत थोरात,उपमुख्य कार्यकारी अधिकारीमहिला व बालकल्याणमुलगी शिकली तर संपूर्ण घर शिकते. त्यामुळे तिला संधी द्या. योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेचा प्रयत्न असतो. माझी कन्या भाग्यश्री योजनामुळे गरीब कुटुंबांना फायदा होईल.- वनिता पाल,सभापती, महिला व बालकल्याण