शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीमधील लायब्ररी चौकात तरुणाचा चाकूने भोसकून खून; जुन्या वादाचा वचपा

By प्रदीप भाकरे | Updated: May 11, 2023 18:40 IST

Amravati News पूर्ववैमनस्य व वचपा घेण्याच्या उद्देशाने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना १० मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा भागातील लायब्ररी चौकात घडली.

अमरावती : पूर्ववैमनस्य व वचपा घेण्याच्या उद्देशाने एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना १० मे रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास फ्रेजरपुरा भागातील लायब्ररी चौकात घडली. घटनेनंतर काही तासांतच या प्रकरणातील सहा आरोपींना अटक करण्यात आली. निखिल ऊर्फ बाबू राजेश तिरथकर (२४, रा. लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा) असे मृतकाचे नाव आहे. मृतक तरुणाने सहा महिन्यांपूर्वी मुख्य मारेकऱ्याच्या लहान भावावर जीवघेणा हल्ला चढवून त्याला जखमी केले होते. त्याचा वचपा म्हणून निखिलचा खून झाल्याचे फ्रेजरपुरा पोलिसांनी सांगितले.

             फ्रेजरपुरा पोलिसांनुसार, देवा रामअधार जयस्वाल (२६) असे मुख्य मारेकऱ्याचे नाव आहे. त्याच्यासह विजय किसनलाल मंडले (३९), शक्ती प्रवीण वाघमारे (२७), करण श्याम मंडले (२४), विशाल पवन मंडले (२३) आणि शुभम प्रकाश परिवाले (२४, सर्व रा. फ्रेजरपुरा) या सहा जणांना फ्रेजरपुरा पोलिसांनी गुरुवारी पहाटेपर्यंत अटक केली. निखिल तिरथकर याने ऑक्टोबर २०२२ मध्ये देवा जयस्वालच्या लहान भावावर चाकूने वार करून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला होता. त्यावेळी निखिल तिरथकरविरुद्ध फ्रेजरपुरा पाेलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचवेळीपासून देवा जयस्वाल आणि निखिल तिरथकर यांच्यात एकमेकांना पाहण्याची ‘खुन्नस’ होती. 

पोलिसांनी वाद शमवलाबुधवारी रात्री १०.३० ते ११ वाजेच्या सुमारास लायब्ररी चौक, फ्रेजरपुरा परिसरात शक्ती वाघमारेचा त्याच्या घरालगत राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत वाद झाला होता. ते भांडण चांगलेच वाढले होते. दरम्यान, या वादात निखिल तिरथकरने मध्यस्थी केली होती. तसेच हा वाद झाल्याची माहिती फ्रेजरपुरा पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे ठाणेदार गाेरखनाथ जाधव यांच्यासह पोलिस ताफा फ्रेजरपुरा चौकात पोहोचला होता. पोलिसांनी भांडण करणाऱ्यांसह जमलेल्या लोकांना घरात पाठवले. त्यावेळी शक्ती आणि निखिल हे सुद्धा आपापल्या घराकडे निघून गेले.

पोलिस होते चौकात, गल्लीत झाला गेम

दरम्यान, त्याचवेळी सुमारे निखिल तिरथकर हा लायब्ररी चौका नजीकच्या एका गल्लीत गेला असता देवा जयस्वाल, शक्ती वाघमारे व इतर चौघे अशा सहा जणांनी मिळून निखिलला अडवले. त्यावेळी देवा जयस्वालने निखिलच्या दोन्ही मांड्यांवर चाकूचे घाव केले. त्यानंतर मारेकरी पसार झाले. त्याचवेळी चौकात असलेल्या पोलिसांनी गल्लीत धाव घेतली. त्याला तत्काळ पोलिस वाहनातून इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरूच असताना काही वेळात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी नेहाल मुकेश तिरथकर याच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी