धन्वंतरी मार्केटसमोरील घटना : कधी होणार वाहतूक सुरक्षित?अमरावती : भरधाव दुचाकी युटर्न घेताना अनियंत्रीत झाली आणि दुभाजकावर आदळली. या अपघातात धीरज मुकुंद उके (२५, रा. भेलापूर मगरु,ता.मोर्शी. ह.मु.सरस्वतीनगर) याचा मृत्यू झाला. धीरजच्या दुचाकीला एका दुसऱ्याच दुचाकीने कट मारल्याने त्याची दुचाकी दुभाजकावर आदळल्याचेही काही नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. धन्वतंरी रुग्णालयातसमोरून तो युटर्न घेत असताना त्यांची दुचाकी अनियंत्रीत होऊन दुभाजकावर आदळली. असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. तर धीरजच्या दुचाकीला अन्य एका वाहनाने कट मारल्याने तो दुभाजकावर आदळल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठले. १०८ रुग्णवाहिकेद्वारे धिरजचा मृतदेह इर्विनला आणण्यात आला.
दुचाकी दुभाजकावर धडकल्याने युवक ठार
By admin | Updated: January 12, 2017 00:10 IST